बीट प्रमुखाचे दुर्लक्ष , अनेकांचे संसार उद्धवस्त
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बळेगाव,रुई खुर्द. रुई बुद्रुक .या तीन गावांमध्ये सरकारमान्य परवानाधारी दारू दुकान नसतानाही अवैध दारू साठा मिळत असून किराणा दुकानात, हॉटेलमध्ये दारूची विक्री होत आहे. दारू ही पार्सल करून विक्री केल्या जात आहे. अनेकांचे संसार दारूमुळे उद्धवस्त झाले आहेत. हि दारू पिऊन काहीजण मरणही पावले आहेत. दारू कुठे व कशी मिळते हे गावातील लहान मुलांनाही माहिती आहे मात्र मात्र पोलीस व संबंधित विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे हा अवैध दारू विक्रीचा गोरख धंदा राजरोस चालू आहे.
अवैध दारू साठा गावांमध्ये मिळत आहे. मात्र बीट प्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत असून बळेगाव रुई खुर्द, बुद्रुक, अशा गावांना मात्र सूट दिली की काय अशी चर्चा बोलल्या जाते . त्यामुळे अवैध दारूचा साठा या छोट्याशा गावांमध्येही होत असताना दारूच्या आहारी तरुण मुले तरुण वयात येण्याच्या अगोदर दारूचे प्राशन करून अनेक संसार उघडे पडले असून काही महिलांचे मुलं पती व्यसनाधीन झाले आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून तरुण मंडळी मात्र दारु विक्री करत आहेत.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा