वनरक्षक कर्मचाऱ्याच्या निष्काळजी पणामुळेच घटना घडल्याची चर्चा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर)
नायगाव तालुक्यात बऱ्याच प्रमाणात जंगल झाडी,व माळराण गायरान जमीनी आहेत.त्यामुळे त्या जंगलात (पडिक गायरान ) जमिनीवर जंगली जनावरं व वन्य प्राणी,पशु पक्षी मोठ्याप्रमाणात असल्यामुळे, आणि हा मार्च महीना आसलयाने उन्हाचे प्रमाण वाढत आहे
त्यामुळे जंगलातील वन्य प्राणी,पशु पक्षी,व वन्य जीव हे अन्न पाण्याच्या शोधात फिरत असतात, त्यापैकीच एक हरीण दि. 12 मार्च रोजी अंदाजे सकाळी सहा वाजता च्या दरम्यान नांदेड -हैद्राबाद राज्य महामार्गावर कुंटूर फाट्या जवळील रोडवरून रस्ता ओलांडून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरीण जखमी होऊन रस्त्याच्या मध्यभागी आसलेल्या डीवायडर वर जखमी अवस्थेत पडल्यामुळे त्या वन्य प्राण्यास वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे या हरणाचा जागेवरच मृत्यु झाला.
जंगल झाडी व वन्य पशु प्राण्यांच्या संरक्षणाना साठी शासनाच्या वनविभागा मार्फत वन कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आसते मात्र हि घटना झालेल्या एरीया मध्ये वनरक्षक शिंदे यांची ड्युटी आसलयाचे घटनास्थळी जमलेल्या लोंकाच्या बोलण्यातून (चर्चा) करीत आसल्याचे दिसुन आले. त्या एरियातील वनरक्षक कर्मचाऱ्याच्या निष्काळजी पणामुळेच त्या वन्य प्राण्यास जिवास मुकावे लागले.
या जखमी हरीणास वनविभागाच्या कर्मचाऱ्याने वेळीच लक्ष देऊन त्यावर वैद्यकीय उपचार कले आसलयास त्या जखमी हरणाचा मृत्यु झाला नसता. आसे त्या घटनास्थळी जमलेल्या वन्य पशु प्रेमी नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करणयात आल्याचे दिसुन आले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा