आ.डॉ.तुषार राठोड यांच्या पाठपुराव्यामळेच वीरभद्र स्वामी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधि मंजूर
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधि शिवाजी कुंटुरकर)
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका असलेल्या मुखेड शहराचे ग्रामदैवत वीरदेवता वीरभद्रस्वामी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मुखेड शहरात असलेल्या विरदेवता वीरभद्रस्वामी यांचे प्राचीन काळातील मंदिर आहे,हे मंदिर या शहराचे ग्रामदैवत आसल्याचे पुर्वीपासुनच बोलल्या जाते.
मुखेड येथील.श्री वीरभद्र स्वामीमंदिरात दर्शना साठी महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येथे मोठया प्रमाणात दर्शनासाठी येतात हे प्राचीन काळातीलअसलेले मंदिर मागील अनेक वर्षापासून नादुरुस्त केलेले अवस्थेत आसल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे अशी मुखेड शहरातील भाविक भक्तांची जुनी मागणी होती. त्यामुळे मुखेड तालुक्याचे आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब हे सुद्धा या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे राज्यामधील सत्तांतर झाल्यानंतर माननीय नामदार मंगलप्रभात लोढा हे पर्यटन विभागाचे मंत्री झाले. आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी माननीय मंत्री नामदार मंगल प्रभात लोढा यांच्याकडे या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सहा कोटी रुपयांची मागणी केली होती.
राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी पाच कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मुखेड तालुक्याचे भारतीय जनता पार्टी चे आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांची भव्यदिव्य मिरवणूक आतिषबाजी ढोल ताशा सह काढण्यात आली... यावेळी शहरातील भाजपा पद्धधिकारी, बाळासाहेब शिवसेना गट, आदी भाविक भक्त शहरातील व्यापारी आणि विविध पक्षातील पद्धधिकारी उपस्थित होते.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा