सगळीकडे शिवजयंतीचा जल्लोष
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे )
कन्नड तालुक्यातील नाचनवेल मारुती मंदिर परिसरात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच कासाबाई शिवाजी थोरात यांच्या हस्ते झाले व उपसरपंच रावसाहेब भीमराव शिंदे यांनी देखील पूजन केले ग्रामविकास अधिकारी नानासाहेब चव्हान सह ग्रामपंचायत पदाधिकारी गावकरी मंडळी मित्रमंडळींनी पुष्प अर्पण करून पूजन केले. त्यानंतर गावातून छत्रपतींच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली
मिरवणुकीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक ,ढोल, पारंपारिक वाद्य, आदींचा समावेश होता. शाळेतील मुलींनी मा जिजाऊ साहेब यांची वेशभूषा मिरवणुकीचे आकर्षण ठरले ठिकठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्याचे गावातील महिलांनी पूजन केले. ठिकठिकाणी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर जि. प. प्रशाला येथे विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला व भाषण केले यावेळी ग्रामस्थ व मुख्याध्यापक सुनिता वडगावकर, व विलास गाडेकर, यांनी शिव प्रतिमेचे पूजन केले यावेळी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले व या कार्यक्रमात प्लास्टिक मुक्त गाव चा संकल्प करण्यात आला
ग्रामपंचायत सदस्य संजय पिंपळे यांनी प्लास्टिक संकलन याविषयी माहिती प्लास्टिक संकलन व्यवस्थित उत्कृष्टपणे करणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस दिले जाईल असे सांगितले, उपसरपंच रावसाहेब शिंदे यांनी प्लास्टिकचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम ची माहिती सांगितले . शिवजयंती निमित्त तारीख 17 रोजी औषधी वनस्पती कोरफडीचे निसर्ग मित्राच्या वतीने स्वखर्चाने वृक्षारोपण करण्यात आले तर तारीख 18 रोजी गावात प्लास्टिकचे दुष्परिणाम व संकलन प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला .
सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे व देशभक्तीवर पोवाडे गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर गावातील काही मित्रमंडळींनी आडगाव येथे रक्तदान शिबिरात देखील सहभाग घेतला व रक्तदान केले. अशा पद्धतीने नाचनवेल येथील सर्व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन मोठ्या आनंदाने व उत्सवात शिवजयंती साजरी केली.यावेळी गावातील समस्त नागरिक महिला, युवा तरुण मित्रमंडळी, शिवभक्त , व शालेय विद्यार्थी यांची उपस्थिती होती.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा