हरभरा हमीभावात नाफेड खरेदी लवकरात लवकर सुरु करा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
हरभरा हमीभावात नाफेड खरेदी लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, कारण शेतकऱ्यांचा हरभरा आता विक्रीसाठी तयार झालेला आहे. हरभऱ्याचा हमीभाव 5330 रुपये असतांना सुद्धा
सध्या व्यापारी बाहेर मार्केटमध्ये 4200 ते 4700 रुपये पर्यंत हरभरा खरेदी करून, सर्रास दर क्विंटल मागे 500 ते 1000 रुपये नफ्याने खरेदी करून शेतकऱ्यांनची लूट करत आहेत. त्यामुळे नाफेड ने हमीभावात लवकरात लवकर खरेदी सुरू करावी . जर लवकर हमीभावात खरेदी सुरू झाली नाही तर आता आलेला पूर्ण शेतकऱ्यांनचा माल बेभावात व्यापाऱ्याच्या घशात जाईल.
त्यामुळे नाफेड खरेदीच्या हमीभावाचा पूर्ण लाभ व्यापारी घेतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने निवेदने देऊनही कुठलीच तक्रारीवरून मार्गी लागल्या जात नसल्याने परिसरातील अनेक महिन्यापासून शेतकरी वर्ग समदुखी बनलेला आहे. शेतकऱ्याच्या दुःखावर मीठ चोळणे शासनकर्त्याची काम नसून त्यांना आधार देणे ही महत्त्वाची आहे.
त्यामुळे लवकरात लवकर संबंधीत विभागाने नाफेड हरभरा खरेदी सुरू करावी. अन्यथा लवकर नाफेड च्या विरोधात शिवसेना - युवासेना च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सुरेश पाटील ढगे इज्जतगावकर यांनी दिला आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा