शिवस्मारक भुमिपुजन व पालखी मार्गावर भव्य मिरवणूक
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर)
दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मांजरम नगरीत रविवार दि.१९ फेबुरवारी रोजी भव्यदिव्य प्रमाणात साजरी करण्यात येत आसून या निमित्त विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.१८ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ६ वा जागर रैली काढुन सर्व शिव भक्तांना जयंती सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन.दि.१९ फेब्रुवारी २०२३ सकाळी ध्वजारोहन सकाळी १० वा. सकाळी गुरु श्री१०८ यदुबन गुरु महाराज यांच्या शुभ हास्ते शिवस्मारक भुमिपुजन संपन होईल दि.१०.३० वा पालखी मार्ग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेची भव्य मिरवणुक निघनार असून या मध्ये ढोल पथक ,लेझीम पथक,गावातील संपुर्ण भजनी मंडळ ,छत्रपतीचे मावळे चा देखावा,शालेय विद्यार्थ्यांचे देखावे व त्यांची विविध पथक, राजेची पालखी,गावातील महिला व पुरुष मंडळी हे ऊपस्थीत राहतील
मिरवणूक प्रारंभ स्थळ::हे शिवस्मारक मांजरम ग्रामपंचायत कार्यालया समोर आहे.येथून च मिरवणूक निघणार आहे तर सकाळी १० वा होणाऱ्या ऐतीहासीक शिवस्मारक भुमिपुजन सोहळ्याला व मिरवणुकीला सर्व शिव प्रेमी मावळे व भक्त यांनी ऊपस्तीथी लावावी असे आवाहन शिव जयंती मंडळ व समस्त गावकरी मंडळी मांजरम यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा