सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांची पर्वणी
शिवशाही वृत्तसेवा, बीड जिल्हा प्रतिनिधी सुनील धिमधिमे
बीड लोकसभा मतदारसंघच्या खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला आहे बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक सांस्कृतिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम यादरम्यान पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात आले गोरगरिबांना ब्लॅंकेट वाटप रक्तदान शिबिर प्रभू वैद्यनाथ देवस्थान येथे महा अभिषेक तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा केला
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या दोन्ही कन्या पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे या समर्थपणे त्यांचा राजकीय वारसा चालवत आहेत तसेच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये जी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे ती टिकून ठेवण्यामध्ये या दोन्ही बहिणीं यशस्वी झाले आहेत आणि आपले राजकीय कारकीर्दही दिवसेंदिवस अधिक उज्वल करत आहेत
त्यामुळेच खासदार डॉक्टर प्रीतम ताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस विविध उपक्रम करून साजरा केला आहे
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा