भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा देण्याचे प्राचार्य डॉ. विजय नागरे यांचे आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा ( जिल्हा प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे )
सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबिड या ठिकाणी नारायणराव नागरे महाविद्यालयात आज इंग्रजी भाषेचा पेपर असून बैठे पथक तैनात करण्यात आले आहे तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून विद्यार्थ्यांनी भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षेला सामोरे जाण्याचे आवाहन यावेळी नारायणराव नागरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे सरांनी केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी तहसीलदार देऊळगाव राजा यांच्या भरारी पथकाने भेट दिली. दुसरबिड या ठिकाणी आधी बोर्डाचे जीवन विकास विद्यालयात एकच केंद्र होते पण विद्यार्थ्यांची तारांबळ होऊ नये यासाठी या वर्षी नारायनराव नागरे महाविद्यालयात परीक्षा केंद्र नव्याने सुरू झाले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा