कार्यवाही करण्याची शिवसेनेची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
तालुक्यातील कुष्णूर एमआयडीसी मधील आनंत सर्जिकल इंडस्ट्रीज या कंपनीत अवैध लाकडांचा साठा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात साठविला जात असल्याने शासनाच्या नियमबाह्य पद्धतीला दुजोरा देऊन सदर कंपनी अवैद साठा करीत असल्याने त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख शिवाजी कुंटूरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वृक्ष तोड होऊ नये आणि भविष्यात विविध समस्या आणि संकटाला समोर जाण्यासाठी शासनाने वृक्षतोडीसाठी बंदी घातली असतानाही संबंधित अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे कुष्णूर एमआयडीसी मधील अनंत सर्जिकल या कंपनीमध्ये अवैधरित्या लाकडांचा साठा मोठ्या प्रमाणात जमविला जात आहे, परंतु सदर वन विभाग अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अवैधरित्या लाकडांची तोड होत असल्याने आणि सदर कंपनीमध्ये अवैध लाकडांचा साठा मोठ्या प्रमाणात जमविला जात असल्याने सदर कंपनी विरोध योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नायगाव तहसीलदार यांच्याकडे शिवसेनेचे युवा तालुकाप्रमुख शिवाजी ईबितदार कुंटूरकर यांनी केली आहे.
नायगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी वन विभाग कार्यालय देगलूर येथे निवेदन देऊनही याबाबत कुठलीच कारवाई संबंधित वन विभागाने केलेली नाही. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा