श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदारनाथ रावल श्री वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव शहरात डॉक्टर बिडवे यांचे कवठेकर बाल रुग्णालयाचे उद्घाटन श्री श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदारनाथ रावल श्री वैराग्य सिंहासनाधीश्वर केदारनाथ यांच्या हस्ते तर माजी आमदार वसंतराव जी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
शेकडो रुग्णांच्या सेवेसाठी नायगाव शहरात प्रसिद्ध डॉक्टर बिडवे यांचे कवठेकर बाल रुग्णालयाचे आज दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता शुभारंभ कार्यक्रम होणार असून याप्रसंगी माजी आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सदर रुग्णालयाचे उद्घाटन होणार असून यावेळी माधवरावजी बेळगे काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष मीनलताई खतगावकर, रवींद्र पाटील चव्हाण, नायगाव नगरपंचायत नगराध्यक्ष मीनाताई सुरेशराव पाटील कल्याण हनुमंतराव पाटील चव्हाण राजेश देशमुख कुंटूरकर, शिवराज पाटील होटाळकर, श्रीनिवास पाटील चव्हाण, श्रावण पाटील भिलवंडे, माणिकराव लोहगावे संजय माधवराव बेळगे ,देविदास पाटील बोंमनाळे , शंकर पाटील कल्याण,संजय पाटील शेळगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव देशमुख, कवठा नगरीचे माजीसरपंच संजय देशमुख नायगाव नगरपंचायत प्रथम नगराध्यक्ष प्रतिनिधी पंढरीनाथ भालेराव ,कवठा नगरीचे सरपंच शिवकुमार देशमुख ,वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नायगाव येथील डॉक्टर एच आर गुंटूरकर, सुप्रसिद्ध डॉक्टर शेख अनिस साहेब, डॉक्टर सुनील देशमुख, डॉ . गुरु नाथ कदम चिकणेकर यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती या शुभारंभ प्रसंगी राहणार असून
आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे अतिथी जनाचे स्वागत नायगाव येथील डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर डी एस शिपाळे, डॉक्टर जी जी वडजे, डॉक्टर शिवाजीराव काकडे, डॉक्टर रामशेठवाड , डॉक्टर अविनाश कोठाळकर, डॉक्टर विश्वास पाटील चव्हाण, डॉक्टर मधुकरराव राठोड, डॉक्टर खांडगावकर डॉ प्रभाकर गायकवाड, डॉ. भीष्मा झुंजारे, यासह अनेक डॉक्टरांची डॉक्टरांनी स्वागत करणार आहेत तरी या आज होणाऱ्या डॉक्टर एस एन बिडवे कवठेकर यांचे कवठेकर बाल रुग्णालयाचे उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत असताना या शुभारंभ प्रसंगी आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती डॉक्टर बिडवे यांनी केली आहे.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा