बळेगावकरांनी मानले मारोतर कवळे गुरुजींचे आभार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कंटूरकर)
नांदेड जिल्ह्य़ातील उमरी तालुक्यातील बळेगाव, माळकौठा, हंगिरगा, बळेगाव, कारेगाव, येथून धर्माबाद या मार्गावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न फार मोठा होता. त्यामुळे बळेगाव, माळकौठा, हंगिरगा, बळेगाव, कारेगाव, या गावांचा तालुक्याला जाण्यायेण्या साठी व दळन वळनासाठी हा मुख्य रस्त्याला ला हा रस्ता जोडलेला एकपदरी , रस्ता आसल्या मुळे या सर्व गावातील नागरिकांना फार मोठया आडचनी येत आसल्यामुळे या संदर्भात बळेगाव येथील शिष्टमंडळ नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे (गरूजी) यांची भेट घेऊन सदरील रस्त्याच्या रुंदीकरणाची तात्काळ अत्यंत आवश्यकता आसल्याची माहिती देऊन या रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण करण्यात यावे अशी माहिती देण्यात आल्यावर, मा.मारोतराव पाटील कवळे (गुरूजी ) यांनी यावेळी पीडब्ल्यूडी चे अधिकारी इंजिनीअर गलधर साहेब यांना बोलावून घेऊन त्या रस्त्याची ठिकाणी जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. , बळेगावकर यांचा जो रस्त्याचा अडचणीचा प्रश्न होता, तो मारोतराव पाटील कवळे (गुरूजी) यांच्या मध्यस्थीने तात्काळ मार्गी लावण्यात आला.
यावेळी कवळे गुरुजी यांच्या समवेत सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड, नायगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील कौडगावकर, दत्तराम पाटील, शिवाजी पाटील, सय्यद गौस पटेल, सय्यद मैनोद्दिन पटेल, माजी पंचायत समिती सदस्य चक्रधर गुंडेवार, बालाजी कटके, सुरेश गाडे, सुदर्शन गाडे, सय्यद मोसिन पटेल, सय्यद शकील पटेल, सय्यद अन्सार पटेल, सय्यद शौकत पटेल, सय्यद शकील पटेल, सय्यद दस्तगीर पटेल, यांच्यासह गावातील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते. यावेळी कवळे गुरुजी यांच्या मध्यस्थीने हा रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे बळेगावकरांच्या वतिने नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे (गुरुजी)आभार मानले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा