महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पंढरपूर येथे शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी पत्रकार भवन येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर होते. ज्येष्ठ संपादक बाळासाहेब बडवे यांनी पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन करताना सांगितले, की "सर्वसामान्य माणसाच्या भावना वेदना अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पत्रकार बांधवांनी घ्यावी या उणीवांची जाणीव करून देत त्यांनी सध्याच्या पत्रकार येथे बद्दल भाष्य केले. पत्रकारिता निपक्षपणे करणे पत्रकारांचे कर्तव्य आहे. स्वतंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये पत्रकारिता ही चळवळ व समाजसेवा राष्ट्रप्रेम होती सध्याची पत्रकारिता ही व्यवसायिक पत्रकारिता असून यामध्ये मानवधर्माचे पालन होणे गरजेचे आहे पत्रकाराने स्वाभिमान जागृत ठेवून पत्रकारिता करावी व सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असे ते म्हणाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सुनील वाळूजकर उपमुख्य अधिकारी नगरपालिका पंढरपूर अविनाश गरगडे व उप माहिती अधिकारी आदर्श शिक्षिका अशा शिरसागर राजेंद्र कोरके पाटील महाराष्ट्र राज्य पश्चिम विभाग उपाध्यक्ष तसेच नूतन शहर अध्यक्ष नागेश आदापुरे तालुका अध्यक्ष मनोज पवार आदी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले . प्रमुख पाहुण्याचे स्वागत राजेंद्र कोरके पाटील यांनी केले. कार्याध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी पत्रकारितेत कालानुरूप होणारे बदल याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश आदापुरे यांनी केले आभार प्रदर्शन रामदास नागटिळक यांनी केले याप्रसंगी कुमार कोरे, विनोद पोतदार,प्रवीण नागणे, संजय यादव, राजेश बदले पाटील, लक्ष्मण शिंदे, नितीन खाडे ,सुनील कोरके, प्रदीप आसबे, अशफाक तांबोळी, आदी पत्रकार सदस्य उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा