मराठवाड्यातील शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाची निवडणूक लागली असून सर्वच पक्ष आणि मराठवाडा शिक्षक संघ यांनी आपले उमेदवार उभे करून आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे परंतु या रस्सीखेच स्पर्धेमध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांचा विजय निश्चित असल्याचे शिक्षकांमधून बोलले जात आहे सविस्तर वृत्त असे की औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लागली असून येत्या 30 जानेवारी 2023 रोजी मतदान होणार आहे यासाठी विविध पक्षाचे उमेदवार आणि शिक्षक संघटनाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून आपलाच विजय कसा होईल यासाठी प्रयत्न करीत आहेत प्रचाराचा धुरळा उडत आहे
उमेदवार आणि त्यांची प्रतिनिधी ज्या ज्या ठिकाणी खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक इंग्लिश मीडियम औरंगाबाद विभागातील शाळेवर प्रत्यक्ष भेट देता उमेदवार आणि त्यांची प्रतिनिधी प्रचार करताना दिसून येत आहेत अनेक प्रश्न शिक्षकांचे संस्थानचे शिक्षक बांधव मांडत आहेत जुनी पेन्शन योजना असेल विनाअनुदानित शाळेचे प्रश्न प्रचलित नुसार शंभर टक्के अनुदान द्या आनंदाने शाळेवरील शिक्षक बांधव ज्यांची सेवा पंधरा पंधरा वर्षे झाली त्यांना विद्यार्थी कमी झाल्यास सेवा संरक्षण मिळाले पाहिजे अशा अनेक मागण्या शिक्षक बांधव बोलल्या जात आहेत पक्ष उमेदवार हे प्रश्न सोडू शकत नाही त्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव हेच उमेदवार शिक्षकांचे प्रश्न सोडू शकतात हा विश्वास मराठवाड्यातील शिक्षक बांधवांकडून बोलल्या जात आहेत
विद्यमान आमदाराच्या विरोधात शिक्षकांमध्ये रोषभाजपा काँग्रेस राष्ट्रवादी यापैकी कोणत्याही पक्षाचा उमेदवार औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातून यापुढे चालणार नाही याचा शिक्षक मतदार छुपा सूर आहे महाराष्ट्रात 2001 सालापासून काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांची सरकार आली आणि गेली पण एकाही सरकारने शिक्षकांचा अनुदानाचा प्रश्न कायमचा मार्गी लावला नाही उलट निवडणुकीच्या तोंडावर थातूरमातूर आश्वासने देऊन मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम सरकारने केले आहे जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना आणली ती कुचकामी ठरत आहे शंभर टक्के अनुदानावर सभागृहात पक्षाचे शिक्षक आमदार बोलताना दिसत नाहीत म्हणून शिक्षकांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाची औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातून शिक्षकांचा बुलंद आवाज सूर्यकांत विश्वासराव यांनाच विधान परिषदेत पाठवणे आवश्यक आहे असा सूर शिक्षक मतदारांतून उमटत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा