उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना फक्त हप्त्याची नशा
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
हप्ते वसूलीत मग्न असलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात कालबाह्य झालेले मद्य विक्री होत असल्याची कसलीच माहिती नाही. पण एका जागरूक नागरिकाच्या जागरुकतेमुळे नायगाव नरसी रोडवर असलेल्या गुरमीत हाँटेलमध्ये कालबाह्य झालेली बियर विक्री करण्यात आल्याची घटना चव्हाट्यावर आली असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करण्यात आली असली तरी भ्रष्टाचारात अखंड बुडालेले अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
नायगाव पासून तीन कि.मी. अंतरावर नरसी रोडवर गुरुमीत बियर बार असून या बारमधून विरेंद्र डोंगरे यांनी (ता. १) जानेवारी २०२३ रोजी हेवर्ड ५००० हि बियर २०० रुपयाला खरेदी केली. सहज उत्सुकता म्हणून खरेदी केलेल्या बियरवरील तारीख पाहिली असता त्यावर (ता.१९.०४.२०२२ ते १८.१०.२०२२) असा वैध कालावधी होता. म्हणजे (ता. १९) एप्रिल २०२२ रोजी तयार झालेली बियर (ता. १८) आक्टोबर २०२२ पर्यंत वैध होती. सदरची बियर पिण्यासाठी सहा महिणेच वैध असल्याचे बाँटलीवरील स्टिकरवरुन दिसून आले.
परंतु गुरमीत हॉटेलने (ता. १८) आक्टोबर २०२२ रोजी कालबाह्य झालेली बियर (ता. ०४) २०२३ रोजी विक्री केली. तबल ७८ दिवसापूर्वी कालबाह्य झालेली बियर विक्री करून तक्रारदाराचे आर्थिक शोषण तर केलेच पण कालबाह्य बियर देऊन शारीरिक इजा पोहचण्याचा प्रयत्न करणेत आला आला असल्याचे नमूद केले आहे.
सहज तारीख पाहण्याची सुबुद्धी सुचल्याने कालबाह्य झालेली बियर निघाली. त्यामुळे तक्रारदाराने बियरचे घोट रिचवले नाहीत. तसे झाले असते तर शरीराला हानिकारक झाले असते. गुरमीत बियर बार हे संगणकीकृत असल्याने आलेला, विक्री झालेला, शिल्लक असलेला आणि कालबाह्य झालेल्या मद्य साठ्याची नोंद असणे बांधणकारक होते. ती असेलही पण कालबाह्य माल विक्री करुन जाणीवपूर्वक ग्राहकांचे जीवितासोबत खेळत आहेत असा तक्रारीत आरोप करण्यात आला असून. गुरमीत हॉटेलचे परवाना रद्द करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विरेंद्र रावण डोंगरे यांनी केली आहे.
नायगावसह अन्य तीन तालुक्याचे मुख्यालय बिलोली येथे असून. उत्पादन शुल्क विभागाचे हे कार्यालय महिण्यातून केवळ १० दिवसच उघडे असते. फक्त हप्ते वसूलीसाठी अधिकारी कार्यालयात येतात पण तालुक्यातील बियर बारमधून काय उद्योग चाललेत याची साधी चौकशीही करत नाहीत. त्यामुळे उत्पादन शुल्क विभाग भ्रष्टाचाराची गटारगंगा झाली आहे. त्यामुळे विरेंद्र डोंगरे यांच्या तक्रारी कधी कायवाई करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा