maharashtra day, workers day, shivshahi news,

अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी निलेश देशपांडे तर सचिवपदी साईनाथ पा.कवळे यांचा दणदणीत विजय

दिवाणी व फौजदारी‎ न्यायालय नायगाव च्या वकील संघाच्या निवडणुकीत ॲड.नारायणराव लंगडापुरे पॅनलचा दणदणीत विजय

Advocates Federation election, Civil and Criminal Court, Naigaon, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

दिवाणी व फौजदारी‎ न्यायालय नायगाव च्या वकील संघाच्या‎ अध्यक्षपदी ॲड‎.निलेश देशपांडे तर‎ सचिवपदी ॲड‎.साईनाथ पाटील कवळे सोमठाणकर हे बहुमताने विजयी‎ झाले असून नायगाव वकील संघाच्या‎ सन २०२३ साठी पार पडलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या‎ निवडणुकीत जेष्ठ विधींतज्ञ ॲड.नारायणराव लंगडापुरे यांच्या मार्गदर्शना खालील पॅनलचे अध्यक्ष पदासाठी ॲड.‎ निलेश देशपांडे व साईनाथ कवळे हे बहुमताने विजयी झाले आहे.

            नायगाव अभिवक्ता महासंघाच्या अध्यक्ष व सचिव पदासाठी झालेल्या‎ निवडणुकीत ॲड. निलेश देशपांडे यांना‎ १४ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी‎ ॲड. बी.एम.वाघमारे यांना ९ मते‎ मिळाली.तर ॲड. निलेश देशपांडे यांना १४ मते पडली देशपांडे यांचा ५‎ मतांनी दणदणीत विजय झाला.‎ सचिव पदासाठी ॲड.साईनाथ पाटील कवळे यांना १५ मते तर प्रतिस्पर्धी ॲड.एस.बी.कुलकर्णी यांना ८ मते पडली.‎तर ॲड. साईनाथ पा.कवळे याना १५ मते पडली कवळे यांचा ७ मतांनी दणदणीत विजय झाला असून जेष्ठ वकील असणारे ॲड.बी.एम.वाघमारे व ॲड.एस.बी.कुलकर्णी यांचा या निवडणुकीत दारून पराभव झालाआहे.

निवडणूक निकालानंतर सर्व‎ वकिलांनी विजयी जल्लोष साजरा‎ केला. या निवडणुकीसाठी निवडणूक‎ निर्णय अधिकारी म्हणून जेष्ठ विधितज्ञ ॲड. के.आर.पाटील सुजलेगावंकर यांनी‎ काम पाहिले तर. या निवडणुकीत ॲड.एस.बी.कदम सोमठाणकर यांचे‎ मोलाचे सहकार्य लाभले.‎

या विजयी जल्लोषाप्रसंगी ॲड‎.के.आर.पाटील, ॲड‎.एन.एस.लंगडापुरे, ॲड‎.यु.जी. मेगदे, ॲड‎.यु.जी.कांगठीकर,  ॲड‎.यु.बी.बिलोलीकर, ॲड‎.एस.बी. इंगोले, ॲड‎.सौ.एस.जी.कोकणे, ॲड‎.एस.एन.जाधव, ॲड‎.एल.एस.तुमेदवार, ॲड‎.एस.बी.कदम सोमठाणकर, ॲड‎.ए.एम.निलंगेकर, ॲड‎.बी.बी. जाधव, ॲड‎.सी.एम. वजीरगांवकर, ॲड.जी.पी. कवळे, ॲड.आर.एल.एकलारे, ॲड‎.के.जी.शिनगारे बिजुरकर, ॲड‎.जे.आय.जावेद,  ॲड‎.एस.एन.मांजरमकर, ॲड‎.एस.एस. गोपछडे, ॲड‎.डी.एम.कुलकर्णी आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष ,सचिव यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !