अध्यक्ष म्हणून युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक असतात सुधीर वसंतराव देवडे यांची सर्वानुमते निवड
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
मरखेल येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोंन्नती अभियान अंतर्गत यूनियन बँक शाखा मरखेल यांच्या संयुक्त विद्यामाने CBRM- community Based recovery mechanism समुदायस्तरीय परतफेड यंत्रणा समिती ची निवड करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून बँकेचे शाखा व्यवस्थापक असतात सुधीर वसंतराव देवडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर सचिव म्हणून ICRP मीराबाई शिंदे यांची निवड करण्यात आली. या समिती मध्ये युनियन बँक शाखा मरखेल अंतर्गत येणारी दत्तक गावे या मधील उमेद अंतर्गत येणारी ग्रामसंघ पदाधिकारी यांचा समावेश असतो.
एकूण 24 सदस्यांची ही बॉडी बँकेच्या कामकाजात अत्यंत महत्वपूर्ण योगदान देणार आहे.सदरील समिती बँकेने समूहाला वितरित केलेल्या थकीत पतपुरवठा वसूल करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणार आहे तसेच बँक कार्यक्षेत्र अंतर्गत येणार गाव व त्यातील समूहाना पत पुरवठा करण्यासाठी मदत करणार आहे. उमेद अभियानातील कमीत कमी समूह थकीत राहावे व योग्य वेळी पत पुरवठा व्हावा यासाठी काम करणार आहे. समुहातील महिला, समूह थकीत राहू नये योग्य वेळी वसुली व्हावी सर्व समूहाना एका ट्रॅक वर आनण्यासाठी व नियमित पत पुरवठा व्हावा यासाठी कार्य करणार आहे.
ही समिती स्थापन करण्यासाठी उमेद तालुका अभियान व्यवस्थापक श्री अमोल जोंधळे, तालुका व्यवस्थापक श्री बाबू डोळे, कौशल्य समन्वयक श्री बालाजी गिरी उपस्थित होते.तसेच भाग्यश्री माळगे,शालिनी सोनकांबळे,श्रीदेवी कांबळे,आशा पांढरे,मीना कोयलकर, रामदिनवार ताई,कार्यक्षेत्रातील ICRP, ग्रामसंघातील पदाधिकारी, समूहातील पदाधिकारी उपस्थित होत्या.
ही समिती स्थापन करण्यासाठी व तालुक्याच्या कामात गतिमानता यावी म्हणून मा डॉ संजयजी तुबाकले साहेब प्रकल्प संचालक व शेखर देशमुख गट विकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केल्या बाबत अमोल जोंधळे यांनी सांगितले तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक मा गजानन पातेवार, मा माधव भिसे, मा द्वारकादास राठोड, मा धनंजय भिसे, मा गणेश कवडेवार, मा स्वप्नील कचवे, मा रमेश थोरात यांनी मार्गदर्शन केल्या बाबत सांगितले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा