विद्युत वितरण कंपनीने लोड शेडिंग तात्काळ बंद करावी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (प्रतिनिधी शिवाजी कुंटुंरकर)
दक्षिण मतदार संघातील काही गावांमध्ये व काही शहरी भागातील विद्युत वितरण कंपनीने सकाळी 6 ते 10 व सायंकाळी 4 ते 6 च्या दरम्यान लाईट बंद करत आहेत शहरी भाग देगलूर नाका. सराफा .होळी .नावघाट. सिडको. हडको .वाजेगाव .धनेगाव .चौफाळा. कॉलोनी. सिद्धनाथपुरी. भोई गल्ली. भावेश्वर नगर. ब्रह्मपुरी .मन्सूर खान हवेली. रंगार गल्ली .अशा भागात बंद करत आहेत
हे सर्व ठिकाण घरगुती वस्तीचे ठिकाण आहेत सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांना तयार होऊन शाळेला जावं लागते त्यांचा या विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे त्यांच्या पाल्यांना सुद्धा त्रास होत आहे कारण सकाळी उठून मुलांना तयार करून यांचे डबे तयार करून देणे त्यांचे ड्रेस प्रेस करून देणे करून देणे व 4 ते 6 च्या दरम्यान व्यापारी लोकांचं खूप मोठे नुकसान होत आहे
या यावेळी सर्व व्यापारी आपला व्यवसाय करतात तरीही लाईट लोड सेटिंग तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी युवासेनेचे जिल्हा समन्वयक अँड अक्षय वट्टमवार युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील युवा सेना शहर प्रमुख राजेश जाधव शिवसेना उपशहर प्रमुख सिमरजीत सिंग सोमनाथ यादव संजय होटकर बालाजी धडके महेश जागापुरे अक्षय रत्नपारखे विनायक डांगेइतर उपस्थित युवासेनिकांनी केले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा