एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी नेवासा यांच्या दुर्लक्षा मुळे तालुक्यातील अंगणवाडींची दुर्दशा
शिवशाही वृत्तसेवा, नेवासा ( प्रतिनिधी विष्णू मुंगसे )
नेवासा तालुक्यातील एकूण 128 गावाचा समावेश आहे या सर्व गावांमध्ये अंगणवाडी गावठाण सर्व वस्तीवर शासनाने मान्यता देऊन कोट्यावधी रुपयाच्या इमारती बांधकाम करून सर्व गोरगरिबांचे मुला मुलींना आहार व शिक्षणासाठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे या सर्व अंगणवाडीमध्ये एक ते सहा वर्षापर्यंत च्या मुला मुलींना शासनाने आहार चालू केला आहे
-size: medium;">
त्यामुळे सर्व अंगणवाडीमध्ये लहान बालकासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून खेळणी आहार हे सर्व मानधनाप्रमाणे काम करून घेण्याची जबाबदारी अधिकारी तालुका स्तरावरील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची असून हे देखील दुर्लक्ष करत असल्यामुळे सर्व नेवासा तालुक्यामध्ये सकाळी अंगणवाडीची वेळ सकाळी 9ते 2 वाजेपर्यंत असून तरी देखील जबाबदारी अधिकारी तालुक्यामध्ये 10ते1 वाजेपर्यंत तालुक्यामध्ये काही ठिकाणी चालू राहतात हे सर्व पाहण्यासाठी तालुक्यामध्ये गटावारी लक्ष देण्यासाठी सुपरवायझर यांची नेमणूक केलेली आहे
तरीदेखील या सर्व सुपरवायझर यांचीही डोळेझाकपणा करीत असून यांच्यावर असलेली प्रकल्प अधिकारी हे देखील मूग गीळून बसलेले दिसून येत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर कोणाचेहि नियंत्रण दिसून येत नाही त्यामुळे आता तरी बाल विकास मंत्री मंगला प्रभात लोढा हे नेवासा तालुक्यातील लक्ष देणार की नाही अशी चर्चेला उधाण आले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा