चव्हाण, होटाळकर यांच्या सहित विविध क्षेत्रातून माधव पाटील यांचे हृद्य सत्कार
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
नायगाव चे भुमिपुत्र तथा दैनिक गाववालाचे तालुका प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार माधव पाटील चव्हाण यांना कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा महत्त्वाचा कै.दुर्गादास सराफ उत्कृष्ट जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून कंधार येथे या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
कै.दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठान व हिंदवी बाणा लाईव्ह च्या वतीने पत्रकारितेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो याच निमित्ताने जेष्ठ पत्रकार माधव पाटील चव्हाण यांच्या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठानचे सचिव सचिव मिर्झा जमीर बेग यांच्या अध्यक्षतेखाली चव्हाण यांना कै.दुर्गादास सराफ उत्कृष्ट जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे
पत्रकार माधव चव्हाण हे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून पत्रकारीता करीत असताना शोषित, वंचित, पिडीत, कामगार, शेतकरी,शेतमजुर यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपली लेखणी झिजवत त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. यामुळे त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आले आहे परंतु नुकतेच कंधार येथे घोषित झालेल्या कै.दुर्गादास सराफ उत्कृष्ट पुरस्काराबद्दल माधव चव्हाण यांचा नायगाव विधानसभेचे नेते माजी आ.वसतराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण, युवा नेते प्रा. रविंद्र पाटील चव्हाण, बालाजी पाटील शिंदे, प्रा.बाबासाहेब शिंदे, माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, चंद्रकांत पाटील होटाळकर,सय्यद भाई, जेष्ठ पत्रकार प्रभाकर लखपत्रेवार, गोविंदराव पाटील पवार, दत्ता पाटील नारे,
पत्रकार रामकृष्ण मोरे देगावकर, अंकुश देगावकर, चंदनकर, सिध्देश्वर इंटरप्राईजेसचे मालक केशव गोविंदराव पाटील आनेराये, गुरुनाथ स्वामी, दत्ता पाटील, नगरसेवक शिवाजी पाटील कल्याण, सदाशिव सुधाकर पाटील आनेराये, सोहेल शेठ बिलोलीकर, बळेगाव नगरीचे सरपंच गंगाधर पाटील बेलकर, शंकरराव पाटील बेलकर, डोंगरगाव नगरीचे चेअरमन सुधाकर पाटील जाधव, मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण सर, लक्ष्यवेध सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक सर, सचिव आनंद सर, शिवाजी खिसे सर, शिवाजी वानखेडे, महेश सर, गजानन चव्हाण जेष्ठ बाळासाहेब पांडे मांजरमकर, माजी तालुकाध्यक्ष माधव मामा कोकुर्ले, तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण, बालाजी नागठाणे, मतीन मुदखेडकर,
संपादक प्रकाशभाऊ हनमंते, माधव बैलकवाड, माधव धडेकर, शेख आरीफ, छायाचित्रकार अवि चालीकवार, चंद्रकांत नरवाडे, रावसाहेब पाटील बेलकर, छावा ता अध्यक्ष प्रताप पाटील सोमठानकर,अजिंक्य पा. कल्याण, जयराम नरवाडे, प्रदीप देमेवार, शिवराज चव्हाण पाटील, माहिती अधिकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष गंगाधर कोत्तेवार होटाळकर, पत्रकार शिवाजी ईबितवार, गंगा बारचे मालक मोहन पाटील चव्हाण, तुकाराम पुरी साहेब, बबलू चव्हाण, शंकर वडपत्रे व मित्र मंडळी यासह आदींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच विविध स्तरातून सुध्दा चव्हाण यांचे अभिनंदन होत असून वाटसप व फेसबुकवरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा