उद्धव ळासाहेब ठाकरे शिवसेना गटा वतीने तहसीलदरांना निवेदनावरे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटुंरकर) जिल्हा प्रतिनिधी
उमरी़ॱ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा तसेच शहरात चालणारे अवैध धंदे मटका गूटखा क्लब तसेच तालुक्यात होणारी अवैध दारुची तस्करी बंद करण्यात यावी अवैध गौण खनिजाचे उत्खनन बंद करण्यात यावे यासंदर्भात तहसीलदार माधवराव बोथीकर यांना तालुका प्रमुख बालाजी पाटील सावंत शिवसैनिकां च्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले
शेतकऱ्यांना थंडीत रात्री बेरात्री जावुन वीज असेल तेव्हा पाणी दयावे लागते अशा स्थीतीत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात यावे .
उमरी शहरातुन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारु चालु असुन युवक तरुण दारु च्या आहारी जाऊन बर्बाद होत असुन गरीबांचे संसार ऊध्दवस्त झाले।त्यांना कोणाची भिती राहिली नाही. शहरात ठिकठिकाणी खुलेआम मटका चालु आहे त्यामुळे गोरगरीब जनतेची लुट चालु आहे.शहर व तालुक्यात गुटखा मोठया प्रमाणात विक्री विक्री केला जात असुन गोदावरी नदी पात्रातुन कोणताही घाट लिलाव झाला नसुन नदीपात्रातुन उपास करुन अवैधरित्या वाळु वाहातुक केली जात आहे. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. शासनाने गोरगरीब घरकुल धारकांना पाच ब्रास वाळु मोफत देण्याचे अश्ववासन दिले होते परंतु गरीबांना वाळू मिळाली नाही. सध्या घरकुल धारकांना वाळु जास्ती च्या पैशाने खरेदी करावी लागत आहे. शासन पोलिस प्रशासन मिळुन शहरात व तालुक्यात अवैध धंदे चालवि-यांवर कडक कार्यवाही करावी अन्यथा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या संदर्भात शिवसेना तालुका प्रमुख बालाजी पाटील सावंत यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार माधवराव बोथीकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी अशोक पाटील जोगदंड ,बाबुराव भुते ,संजय हंबर्डे ,सुरेश ढगे,आबाजी पवळे,बालाजी शिंदे ,मारोती वाघमारे, रावसाहेब वडजे ,डॉ गोविंद राठोड साईनाथ हिवराळे ,साईनाथ मुटकुटवार , गोविंद शिंदे,दतराम ढगे,आनिल सुर्यवंशी, विनायक सुर्यवंशी, कैलास बसवंते ,कामाजी शिंदे, मारोती चंदापुरे ,दिलीप सरोदे ,संजय हंबर्डे ,आनिल शिंदे ,लक्ष्मण शिंदे, मोहन कदम सोपनराव गायकवाड ,गंगाधर गुंडेवाड , दता सुंगुरवाड ,आदी शिवसैनिक निवेदन देताना उपस्थित हौते.
शहरातील मटका गुटखा क्लब , व तालुक्यात अवैध दारुची तस्करी वाळू व गौण खनिजाचे उत्खनन इत्यादी अवैध धंदे बंद.करण्यासाठी तहसीलदार माधवराव बोथीकर ,उमरी पोलिस स्टेशन निरीक्षक मोहन भोसले यांना अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा