मुख्यमंत्र्याच्या नावे असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची नागरिकातुन मागणी 

Chief Minister Gram Sadak Yojana, Poor quality of road work, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कुंटूरकर) जिल्हा प्रतिनिधी

चारवाडी ते हांगरगा जोड रस्ता क्रमांक 85 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत डांबरीकरण रस्ता झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे चालु काम आहे. कुंटुर ते सालेगाव रस्त्याला जोडनारा रस्ता चारवाडी ते हांगरगा   दोन किलो 10 मीटर अंतरावर  असलेल्या हांगरग येथील रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 85 योजनेतून हांगरग तालुका नायगाव जिल्हा नांदेड 2019 ला या कामाला मंजुरी मिळाली व 2022 ला हे  काम चालू झाले . अत्यंत धीम्या गतीने होणारे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे .  व ते आज चार वर्ष संपूनही काम अर्धवट स्थितीत असून रस्ता ना गिट्टी व शिलकोट अंतरुन सरस कामगिरी चालु आहे रस्ते सुरक्षा योजनेअंतर्गत शासनाचे 106.13कोट्यवधी रुपये खर्च होऊन सुद्धा जनतेच्या उपयोगी  रस्ते येत नसेल तर काय कामाचे म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब स्वतः लक्ष घालून उच्चस्तरीय चौकशी  करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातुन होत आहे. 

या कामासाठी 4 ते 5 वर्षे पूर्ण होत आहेत.

हंगरगा रस्त्याचे सुधारणा करणे रस्त्याची लांबी दोन किलोमीटर दहा मिटर आहे मंजुरी रक्कम एक कोटी सहा लाख रुपये चे काम आहे. या रस्त्याचे पाच वर्षाच्या देखभालीचा रक्कम सात लाख 33 हाजर आहे. काम पूर्ण करायची कालावधी 16/9/ 1919 आहे. काम पूर्ण करायचा दिनांक 15/ 9/2020 देखभाल दुरुस्ती सुरू करण्याचा दिनांक 16 /9 /2020 देखभाल दुरुस्ती पूर्णता दिनांक 25 /9/ 2025  ठेकेदाराचे नाव जे जी कंट्रक्शन नांदेड कारवाई नियंत्रणाचे नाव कार्यकारी अभियंता प्रामा महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विसा नांदेड अर्थसाह्य ग्रामीण विभाग महाराष्ट्र शासन आहे.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !