मुंगसे परिवारावर दुःखाचा डोंगर
शिवशाही वृत्तसेवा नेवासा (विष्णू मुंगसे )
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बालाजी देडगाव येथील कै.केशव ठकाजी मुंगसे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 58 वर्षाचे होते गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. स्थानिक दवाखान्यात त्यांच्या उपचार सुरू होते. कै. केशव ठकाजी मुंगसे हे गावातील एक प्रतिष्ठित नागरिक होते. वारकरी संप्रदाय, व अध्यात्मिक मंडळींमध्ये त्यांची उठबस होती. यांच्या पश्चात आई व वडील, दोन मुले, दोन मुली, सून ,पत्नी असा परिवार आहे. देडगाव चे प्रगत शेतकरी सोमनाथ मुंगसे व ज्ञानदेव मुंगसे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने मुंगसे परिवार शोकसागरात बुडाला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा