गावकऱ्यांनी केली विविध कामांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
नायगाव तालुक्यातील आलुवडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता सरपंच सौ.प्रियंका वाघमारे,ग्रामसेविका सौ.जी.एच. शिंदे, यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा खेळीमेळीचे वातावरणात पार पडली ग्रामसभेत गावातील विविध विकास कामांचा वार्षिक आढावा घेण्यात आला. ग्रामसभेतील ग्रामस्थांच्या सहविचाराने सन २०२२/२३ वार्षिक आराखडा तयार करण्यात आला.
ग्रामसभेत नागरिकांच्या वैयक्तीक लाभांच्या योजना जसे की. सिंचन विहिर,शेत तळे, गाय गोठा, शेळी पालन शेड, कुकुट पालन शेड, व सार्वजनिक हिताच्या योजने अंतर्गत शिव रस्ते,पांदण रस्ते,शेत रस्ते आदी कांमाची वार्षिक आराखड्यात नोंद करणयात आली व तसेच या ग्रामसभे मध्ये ग्रामपंचायती अंतर्गत यणाऱ्या नऊ समित्यांची नविन निवड करण्यात आल्या त्या मध्ये मुख्यतः नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी समिती ही समिती किमान अंदाजे तीन वर्षापासून या समितीची निवड करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे गावातील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच संभाजी पवार यांच्या प्रयत्नाने यांनी वरिष्ठ कृषि कार्यालयाशी व संबंधित अधिकारी यांची भेटी घेऊन पत्रव्यवहार केल्यामुळेच या समितीची पुनर्निर्मिती निवड करण्यात आली.
सोबतचं सार्वजनिक वितरण व्यवस्थे मार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूवर देखरेख ठेवण्यासाठी देखरेख समिती म्हणजेच ग्राम दक्षता समितीची नवीन निवड करण्यात आली. तसेच जैविक विविधता समिती व ग्राम आरोग्य पोषण व पाणीपुरवठा स्वच्छता समिती, जन्म मृत्यू नोंदणी व जीवन विषयक आकडेवारी संबंधी विविध स्तरावर समिती, बाल संरक्षण समिती, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना देखरेख व दक्षता समिती, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अशा प्रकारच्या नऊ हि ग्रामपंचायत कार्यालयाच्या अधिकाराखालील आसलेलया ग्रामसभेत बिनविरोध नऊ समित्यांची निवड करण्यात आल्या.
सन २०२२/ २३ मध्ये करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला. या वेळेस घेण्यात आलेल्या ग्रामसभे चे अध्यक्ष सरपंच सौ.प्रियंका वाघमारे,ग्रामसेविका सौ.जी.एच. शिंदे, माजी सरपंच संभाजी पवार, सामाजिक कार्यकर्ते नागोराव पा.बंडे, सेवा सहकारी सोसायटी आलुवडगाव चे चेअरमन श्रीराम पवार, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत कोठाळे, ग्रा.पं.स.प्रतिनिधी राजेश इंगोले,गिरीराव ईगोंले,रोजगार सेवक शिवराज इंगोले, बाबनसाहेब शेख, तानाजी इंगोले, वसंत इंगोले, तानाजी जाधव,मारुती जाधव, बाबुराव वाघमारे, विकि वाघमारे,संजय कांबळे, आनंदा ईगोंले,मरीबा कांबळे,वंसंत आडे व गावातील महिला व पुरुष या ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात उत्साहाने उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा