भारतासारख्या कृषिप्रधान देशातील शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती जाणून घेतली
शिवशाही वृत्तसेवा, सिल्लोड (मिलिंद कुमार लांडगे)
सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील माधव ठिबक कंपनीला केनियाच्या शिष्टमण्डळाने भेट देऊन प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. ल्यूक्यानिया एग्रीकल्चर यूनिवर्सिटी चे काउंसलिंग मेंबर डेविड , यूनिवर्सिटी चे एग्जकेटिव मेंबर सॅमी, यांचे स्वागत माधव ठिबक कंपनीच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले.त्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात परंतु दर्जेदार शेतीस उपयुक्त ठिबक, स्प्रिंकलर बनवनारी माधव ठिबक कंपनीच्या कामकाजची पाहनी करताना शेतीसाठी फायदयाचे, पाण्याची बचत, शिवाय मनुष्य बळाची फ़ारशी गरज भासत नाही हे पाहून प्रभावित झाले. शिवाय वडाळा येथील आकाश शेळके यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जात ठिबक आणि स्प्रिंकलर च्या कामकाजाचे पाहनी करत मका पिक उत्पादन देखील त्यांनी पाहनी करुन आधुनिक पद्धति जानून घेतली.
यावेळी त्यांनी कंपनी मार्फ़त ठिबक कशा रितिने बनवले जाते, पाइपसह ठिबक बनवनारी मशीनरी या सर्वांचे त्यांनी निरिक्षण करुन कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्य जाणून घेतले. केनिया देशविषयी माहिती सांगताना अफ्रीका खंडातील 56 देशापैकी केनिया हा लहान देश असून देशाची शेती विषयक फारशी प्रगति नसल्याने आपल्या देशात भारतासारख्या कृषिप्रधान देशातील शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती जाणून घेऊन प्रत्यक्ष त्यानुसार आपल्या देशात कंपनी स्थापन्याचा तसेच माधव कंपनीशी केनिया यूनिवर्सिटी सोबत जोड़ कराराची चर्चा झाली व सह कामकाज करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
केनियातिल विद्यापीठ प्रतिनिधी येण्याचे कारण असे की, केनिया दौर्यावर माधव ठिबकचे युवराज महाजन, डॉक्टर भगवान कापसे, विलास कापसे हे गेले असता त्यांनी तेथील शेती पाहिली व मागसलेपन पाहिले व तेथील शेतकरी सुधारावा व आपल्याही कंपनित उत्पादित होनारे ठीबक तिकडे विकल्या जावे म्हणून केनिया सिस्ट मंडळास साकडे घातले की आमच्याकड़े या, पाहनी करा. काही दिवसातच त्यांनी दौरा आखत भेट दिली.
ज्ञानविकास विद्यालय भराड़ीच्या विद्यार्थियांनी ढ़ोल पथक, लेझिम संचलनाच्या बहारदार रितिने केलेल्या स्वागताचा स्वीकार करत प्रत्यक्ष संवाद साधत तेथील हवामान लोकांचे राहनीमान, संस्कृति, शेतीतील प्रमुख पिके याबाबत प्रत्यक्ष चर्चा करत जाणून घेतल्या. भाषा विविधता,प्रादेशिक अंतर असूनही विद्यार्थी प्रश्न विचारत माहिती जानून घेत असल्याचे पाहुन सबंधित वीद्यापीठाचे प्रतिनिधी भारावून गेले.
त्यांच्यासमवेत केनिया गवर्नमेंटचे काउंसलिंग मेंबर सचिन शहा , वैजापुर- दहेगांव येथील रामकृष्ण कृषि विद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक लड़कत, डॉ. बैनाडे , नुजीवडू संशोधन संस्थाचे प्रमुख मैनेजर डॉ. माने, महाकेशर आंबा संघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ. भगवान कापसे, एग्रो वनचे उपसंपादक श्री. संतोष मुंडे उपस्थित होते. युवराज महाजन, विलास कापसे, कडुनाथ महाजन, गजानन महाजन, विकास कापसे, विशाल महाजन, ज्ञानविकास विद्यालयाचे अंकुश सोनवने, संदीप साळवे, नरेश बलकार, अनिल थोरात, कृष्णा सपकाळ आदिनी संवाद साधला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा