India Republic Day, shivshahi news,

चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील सरपंच पदाच्या उमेदवार अरुणा केदार यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा

प्रचारात विनापरवानगी वाहन आणि लाऊड स्पीकर वापरल्याचा ठपका 

Sarpanch candidate break code of conduct, Aruna Kedar, gunjala, chikhali, buldhana, shivshahi News,

शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिक सोनपसारे)

बुलढाणा जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा माहौल आहे. काल, १६ डिसेंबरला प्रचाराचा शेवटचा दिवस होता. उद्या १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यंदा थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक असल्याचे सरपंच पदाच्या उमेदवारांनी पूर्ण ताकदीने प्रचार केला. काल, प्रचार आटोपला असला तरी आज आणि उद्या मतदान होईपर्यंत खरा - छुपा प्रचार होणार आहे. 

दरम्यान चिखली तालुक्यातील गुंजाळा गावच्या सरपंच पदाच्या उमेदवार अरूणा सुनील केदार यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अंढेरा पोलीस ठाण्यात काल, १६ डिसेंबरच्या संध्याकाळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुणा केदार या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या आहेत. 

 

१५ डिसेंबरला त्यांनी कोणतीही परवानगी घेता वाहनांवर लाऊस्पिकर, एलइडी द्वारे प्रचार केला. निवडणुकांचा प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची परवानगी घेतल्यानंतरच त्या वाहनाद्वारे प्रचार करता येतो, मात्र तशी कोणतीही परवानगी न घेता प्रचार केल्याने चिखली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विलास राजाराम अंभोरे यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात अरूणा केदार यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. अरुणा केदार यांच्यासह प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या एम एच २८,बिबी ३६३९ व एम एच २८ एबी ३५३६ या वाहनांच्या चालकांविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !