तर महाराष्ट्र नक्कीच एका अराजक मार्गावर जात आहे
"आंबेडकर बोट का दाखवतात? तर ते म्हणतात की, "वोह खाली प्लॉट हमारा है!" - स पा नेता आझम खान"आंबेडकर नेहरूसाठी घरी दारूच्या बाटल्या ठेवायचे" - बामसेफ नेता वामन मेश्राम.
असे अनेक विधान मी दाखवू शकतो, ज्यामधे बाबासाहेबांचा उपहास उडवलेला आहे, पण इथे मात्र उडवणारे कोण ? हा प्रश्न आहे. ते भाजपाचे नाहीत की ब्राह्मण नाहीत, मग इथे आमच्या पेनाची शाई आटते. आज सगळीकडे जल्लोष दिसत आहे, बरेच जण चंद्रकांत दादांवर झालेल्या शाई हल्ल्याचे स्वागत करताना दिसत आहेत... करा... अजून स्वागत करा अशा प्रकारांचे म्हणजे पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था सर्व कुचकामी आहे, लोकशाही आणि संविधान ह्या सर्व गप्पा आहेत हे वारंवार सिद्ध करा स्वतःच्याच कृतीतून. हल्ले करून आणि शाई फेकून जर न्याय मिळवायचा असेल तर बंद करा न्यायव्यवस्थेची दुकानं. आज "संविधान बचाव" वाले या कृतीचे समर्थन करत आहेत, उद्या तुमच्या नेत्याच्या बाबतीत असा कुठला प्रकार झाला तर महाराष्ट्र पेटवण्याची भाषा कराल, किंबहुना पेटवाल कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या देशात झुंडशाही, गुंडशाही आणि दंडेलशाही ही लोकशाहीला नेहमीच भारी पडत आलेली आहे. हिंदू देवी-देवता आणि संतांची हजारो वेळा विटंबना होते, सुषमा अंधारे सारख्या बाया, आणि अमोल मिटकरी सारखे (याला बाई म्हणावं, माणूस म्हणावं की अजून काही? ) रोज उठता बसता संत सज्जन तसेच हिंदू देवी - देवता, प्रथा पद्धती आणि सण-उत्सव यांच्या विटंबना करत असतात. कायदेशीर मार्गाने यांच्या विरोधात साधी तक्रार दाखल करण्याची सुद्धा सोय महाराष्ट्रात नाही. पोलीस तक्रार घेत नाहीत, टाळाटाळीची भूमिका घेतात. हा आमचा अनुभव आहे.
इथे चंद्रकांत दादांचे जे वाक्य आहे त्यावर त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली त्याच्यावर प्रतिवाद होऊ शकले असते. "जोहार मायबाप" हा संत साहित्यात येणारा शब्द, पसायदान हे माऊलींनी मागितलेले दान, किंवा मधुकरी मागताना "भिक्षाम देही" म्हणणे या सर्व गोष्टींना दुसऱ्या भाषेत भीक मागणे असेच म्हणता येईल, भीक पण कशासाठी? परमार्थासाठी. म्हणून ती भीक राहत नाही तिला योग्य पर्यायी शब्द येतो. भाषेच्या अज्ञानाने तो पर्यायी शब्द आठवला नाही आणि भीक हा शब्द आला त्यावर उपाय काय? अर्थातच दिलगिरी व्यक्त करणे, माफी मागणे. या गोष्टीचा एवढा बाऊ करून संविधान वाचवण्याचा हा असंविधानिक प्रकार अत्यंत निंदनीय आहे.
२६/११ च्या हल्ल्यानंतर आर आर आबांचे ते विधान "बडे बडे शहरोमे छोटी छोटी बातें होती राहती है" या विधानावर जर कोणी शाई फेकली असती तर? पण आम्हाला आबांच्या मनात काय होते याची कल्पना होती म्हणून केवळ निंदा आणि निषेध झाले. आज मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्थर खूप खाली गेलेला आहे.
चंद्रकांत दादांच्या विरोधात मी लिहिलेले आहे, बोललेलो आहे आणि नेमकं त्याच दरम्यान आमची एका कार्यक्रमात गाठ सुद्धा पडली होती. लिहिण्याचा बोलण्याचा निषेध व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण अशा कृत्यांचे जर तुम्ही समर्थन करत असाल तर महाराष्ट्र नक्कीच एका अराजक मार्गावर जात आहे याची खात्री बाळगावी. परवा संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याने भास्कर जाधव या शिवसेनेच्या नेत्यासमोर आम्ही रायगडावर तोडफोड करू, चाल करू अशा आशयाचे विधान केले गेले, मग एक काम करा ना पोलिसांना साडी चोळीचा आहेर करून घरी बसवा, त्यांचं काय काम आहे? प्रत्येकाने हातात शस्त्र उचला आणि फोडा एकमेकांची टाळकी.
१२ जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सवात "अप्सरा आली" गाण्यावर बाया नाचवता तेही आईसाहेब जिजाऊंच्या मूर्ती पुढे, तेव्हा नाही काय होत अपमान? मिटक्या मारत लावण्या ऐकणारे आज पेनाची शाई फेकून निषेध करत आहेत, वा रे वा लोकशाही..
तुमचे त्रिवार अभिनंदन
सचिन पाटील
लेखक इतिहास तथा राजकीय भाष्यकार आहेत
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा