महिलांनी प्रभागसंघाला सक्षम करावे - मलेश एडके
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर )
नायगाव तालुक्यातील मौजे कुंटुर येथील सार्वजनिक वाचनालय मध्ये नारी शक्ती महिला प्रभाग संघ कुंटुर ची मासीक बैठक संपन्न झाली. यामध्ये परिसरातील बळेगाव, कोकलेगाव, राजगडनगर, कुंटुर तांडा, घुंगराळा,कोठाळा,परडवाडी, येथील महिला ग्राम संघाची बैठक घेऊन त्यांना विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय सुरू करावे अशा माहिती दिली. यावेळी नायगाव तालुक्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापक मलेश एडके सर, बाबू चंद्रकांत डोळे, ईरवंत सुर्य काय सर ,कुंटुर ग्रामीण बॅंक चे शाखाधिकारी सोनवणे, कशीयर गुंठे सर,. महाराष्ट्र ग्रामीण बँक कशिअर , नारी शक्ती महिला प्रभाग संघ अध्यक्ष कोमल गजभारे, लता कुंटुरकर, रेखाताई अनिल कांबळे कुंटुरकर ICRP. उपस्थित होते.
प्रभागसंघ एकत्र येऊन एकजुटीने काम केले तर तुमची उन्नती होते. ग्रामसंघ चे रजिस्टर पासबुक योग्य ठेवून दर महिन्याला बैठक घ्यावी. समुहांनी आठवडी बैठक घेऊन दशसुत्री नियमांचे पालन करावे व उद्योग व्यवसाय बाबत मार्गदर्शन केले. प्रभाग संघ कुंटुर मासिक बैठक संपन्न झाली. यावेळी दहा ग्रामसंघ उपस्थित होते. डॉ.बी .आर.आंडेकर, ग्रामसंघ कुंटुर, एकता महिला ग्राम संघ कुंटुर, राणी लक्ष्मीबाई ग्रामसंघ कुंटुर तांडा, मंगलमूर्ती ग्रामसंघ परडवाडी, महात्मा गांधी ग्रामसंघ बळेगाव, परिसरातील ग्रामसंघ उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा