प्रस्थापितांचा धक्कादायक पराभव
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (शिवाजी कूंटुंरकर)
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील फळसातेगाव, सुजलेगाव, रुई खुर्द या तीन ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाने ताबा मिळवला आहे. सुजलेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत पाच उमेदवार निवडून आले तसेच सरपंच पदही मिळाले. रुई खुर्द येथील पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून दोन उमेदवार निवडून आल्याने कांग्रेस पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत गेली आहे.
कुंटूर परिसरातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे त्यात काँग्रेस गटाला तीन ग्रामपंचायतीवर ताबा मिळवण्यात यश आल्याचे चित्र आहे. सातेगाव येथे प्रकाश पाटील जाधव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून आले असून एकतर्फी विजय मिळवला आहे .सुजलेगाव ग्रामपंचायत मध्ये कुंटूरकर गटाचे चार उमेदवार विजयी झाले असून काँग्रेस गटाचे पाच उमेदवार निवडून आल्याने कित्येक वर्षांनंतर काँग्रेस पक्षाच्या ताब्यात ग्रामपंचायत आली आहे.
कै. गंगाधरराव कुंटूरकर यांच्या ताब्यात असलेली सुतलेगाव ग्रामपंचायत आज काँग्रेसने हिसकावली असल्याचेही दिसून आले आहे. तसेच रुई खुर्द येथेही कुंटूर गटाचा वर्चस्व असल्याचे दिसून आले होते, मात्र सामन्यांमध्ये बीजेपीच्या उमेदवारांना धक्का देत काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याने रुई खुर्द येथेही काँग्रेस पक्षाचा सरपंचपदाच्या उमेदवाराला बहुमत मिळाले असून येथे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते . त्यामुळे दोन उमेदवाराचे व सरपंचपदाच्या उमेदवाराने बहुमत घेऊन विजयी झाल्याने पूर्ण गटाचे सातही उमेदवार निवडून आले . त्यामुळे रुई खुर्द येथेही एकतर्फी विजय झाला असल्याचे दिसून आले. जनतेने तरुण तडफदार व विकासाभिमुख नेतृत्वालाच साथ दिल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. त्यामुळे तिन्ही गावांमध्ये सत्तापालट झाल्याचे दिसते. काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी गावात विकास कामे करून, आपल्या गटाचा विकास तसेच आपल्या परिसरातील नागरिकांचा विकास करून ग्रामपंचायतची सत्ता कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा