उद्घाटक संजय आवटे, तर स्वागताध्यक्ष सरपंच सौ. आशाताई मारोतराव कदम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड ( शिवाजी कुंटूरकर जिल्हा प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि पू. साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, बहुद्देशिय प्रतिष्ठानच्या साने गुरूजींची धडपडणारी मुले कुंटूर यांच्या वतीने कुंटूर येथे येत्या २२ जानेवारी रोजी होणाऱ्या ७ व्या लोकजागर ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ट साहित्यिक राजन गवस यांची निवड करण्यात आली तर संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध विचारवंत तथा संपादक संजय आवटे यांच्या हस्ते होणार आहे.
संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणुन कुंटूरच्या सरपंच सौ. आशाताई मारोतराव कदम यांची निवड करण्यात आली आहे. या एक दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथ व भाषा भगीणी दिंडी, चित्र व पुस्तक प्रदर्शन, उद्घाटन सोहळा, पुरस्कार वितरण, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन आणि रात्री लावणी महोत्सव असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या संमेलनासाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवी, लेखक, कलावंत उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजक म्हणुन राजेंद्र नालेकंठे, कार्यवाह विनोद झुंजारे, सहकार्यवाह मौलासाब शेख यांच्या संयोजनाखाली विविध समित्यांमार्फत संमेलनाची तयारी केली जात आहे.
नायगाव तालुक्यातील साहित्यरसिकांनी या संमेलनातील कार्यक्रमांच्या मेजवाण्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने शिवाजी आडकीने, राजेश आडकीने, डॉ. बाळू दुगडूमवार, मारोतराव कदम कुंटूरकर यांने केले आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा