एक कोटीचा निधी मंजूर, गरीब रुग्णांवर होणार मोफत उपचार.
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिक सोनपसारे)
शहरातील ७० होमिओपॅथिक डॉक्टरांनी गरीब रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्याचा निश्चय करून होमिओपॅथीक भवन उभारावे अशी मागणी होमिओपॅथी असोसिएशनच्या वतीने आ.संजय गायकवाड यांच्याकडे करण्यात आली. त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत आ. संजय गायकवाड यांनी या भवनाकरिता भूखंड तसेच 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला.
शहरात जवळपास ७० होमिओपॅथिक डॉक्टर आपली सेवा देऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत. बुलडाणा आणि जवळपासच्या परिसरातील गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा देण्याचा या संघटनेचा मानस आहे. तसेच संघटनेच्या वतीने आ. संजय गायकवाड यांचा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून झालेल्या नियुक्तीबद्दल सत्कार देखील करण्यात आला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा