प्रखर हिंदुत्ववादी सावरकर भक्त अभिनेते शरद पोंक्षे यांना हिंदुत्व शौर्य पुरस्कार प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
"माझे क्रांतिकार्य विसरले तरी चालेल. पण मी रत्नागिरी मधे केलेले जातिनिर्मुलनाचे काम लक्षात ठेवा." "तसेच मला ना मुसलमानांची भिती, ना ख्रिश्चनांची मला हिंदूंचीच भिती वाटते." "असे वीर सावरकरांनी लिहुन ठेवले आहे. सन १९२३ साली असलेली हिंदुंमधिल जातीतेढ कमी न होता, वाढतच आहे." असे उद्गार सुप्रसिद्ध वीर सावरकर साहित्याचे अभ्यासक व लोकप्रिय कलावंत शरद पोंक्षे यांनी काढले. पंढरपूरात दिला जाणारा, प्रतिष्ठेचा क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्काराने पोंक्षे यांना सन्मानीत केले, यावेळी उत्तर देताना ते बोलत होते.
डॉ. संभाजीराजे पाचकवडे यांच्या अध्यक्षतेखाली व ह.भ.प. जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी म,प्र. हिंदुसभाध्यक्ष अनिल पवार, पंढरीचे नटसम्राट विनय बडवे, मनसे नेते दिलीप धोत्रे, सुप्रसिद्ध सिनेकलावंत राधीका देशपांडे व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात रिध्दी व सिध्दी हरिदास यांच्या, वीर सावरकर रचीत ध्वजगीताने झाली, बाळाराव डिंगरे यांनी स्वागत केले. तर अभयसिंह इचगावकर यांनी प्रास्ताविक केले. विवेक बेणारे यांनी मानपत्राचे वाचन केले. नंतर पोंक्षे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ११ सहस्त्र रुपये रोख,हार, शाल, श्रीफळ, मानपत्र, असे पुरस्काराचे स्वरुप होते.
यावेळी बोलताना पोंक्षे पुढे म्हणाले की, अंदमानच्या तुरुंगामधे दाखल झाल्यावर वीर सावरकरांना गुरु गोविंदसिंह आठवले. पन्नास वर्षांनी आपण या तुरुंगाच्या बाहेर पडणार हे ठावूक असणारा हा २७ वर्षांचा युवक यावेळीही राष्ट्राचाच विचार करत होता. आपणाला साधे कोरोना काळातील , आपल्या स्वतःच्या घरातील, आपल्या माणसातील बंदीवासाने त्रास झाला. मग वीर सावरकरांना किती त्रास झाला असेल? मात्र सावरकरांचे आत्मबल इतके प्रखर होते की, अश्या वेळीही त्यांना देशाचाच विचार करावा वाटला, पोंक्षेंच्या ओघवत्या भाषणापूर्वी क्रांतीवीर वसंतदादा बडवे ट्रस्टचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी यांनी पुरस्कारामागील भुमिका स्पस्ट केली. विपरीत परिस्थितीत हिंदुत्वाचा प्रचार व प्रसार करणारांच्या पाठीशी कौतुकाची थाप मारणे व विठोबाचा आशिर्वाद देणे, संतांचा आशिर्वाद देउन त्यांची कार्य करणेची उर्मी वाढवणे . हाच या पुरस्काराचा हेतू असलेचे त्यांनी सांगीतले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमात आभाराचे काम डॉ. सचिन लादे यांनी केले तर तुकाराम चिंचणीकर यांनी संपूर्ण वंदेमातरम गान केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मैत्रेयी केसकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेक बेणारे,विकास मोरे,दिपक कुलकर्णी, ओंकार वाटाणे यांनी परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा