नगर विकास विभागाचे आदेश : कार्यवाही तत्काळ सुरू करण्याच्या सूचना
शिवशाही वृत्तसेवा मुंबई
सोलापूर सह राज्यातील 24 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने मंगळवारी काढले. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिका च्या आगामी निवडणुकीसाठी 2011 च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या / रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी सूचना नगर विकास विभागाने संबंधित महापालिका महा विकास आघाडी सरकारच्या काळात लोकसंख्या वाढीच्या आधारावर सरासरी प्रभाग/ वार्ड संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई महापालिकेत नऊ प्रभागांची तसेच अन्य महापालिकांत वाढीव लोकसंख्येनुसार प्रभागांची रचना करण्यात आली होती. ही प्रभाग रचना राष्ट्रवादी व शिवसेनेच्या फायद्यानुसार करण्यात आल्याचा आरोप होत होता. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीने केलेली प्रभाग रचना रद्द करून आधीप्रमाणेच प्रभाग रचना करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई महापालिका प्रभाग रचनेचा विषय सध्या न्यायालयातही सुरू असून, यावर 28 नोव्हेंबरला सुनावणी आहे. दरम्यान, राज्य सरकारने यावर निर्णय होण्याआधीच महापालिका प्रशासनाला प्रभाग, वाॅर्डाची संख्या निश्चित करून प्रभाग रचना नव्याने करण्याचा आदेश दिले आहेत.
या पालिकांसाठी नव्याने प्रभाग रचनामुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, वसई-पुणे पिंपरी - चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नांदेड-वाघाळा लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर या २३ महापालिकांची मुदत संपली आहे . तेथे सध्या प्रशासक कारभार पाहत आहेत. तर नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी महापालिकेची प्रथमच निवडणूक होईल, त्यामुळे सध्या राज्यातील 28 पैकी 24 महानगरपालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात येईल.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा