अरेच्चा.... विजय आणि रश्मिकाने कधी केले लग्न ?
पॅन इंडिया स्टार विजय देवरकोंडा आणि ' पुष्पा 'स्टार श्रीवल्ली अर्थात रश्मिका मंदाना, यांच्या अफेअरच्या चर्चा दीर्घकाळापासून रंगले आहेत. त्यांनी दक्षिणेत ब्लॉकबस्टर ठरलेल्या ' डियर कॉम्रेट ' व ' गीता गोविंदा 'या सिनेमात एकत्र काम केले आणि त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती.
विशेष म्हणजे, दोघेही एकमेकांना अनुकूल असल्याचे वारंवार दिसून आले आहे. आता आलेल्या नव्या चर्चेनुसार दोघांनीही गुपचूप लग्न उरकले असल्याचे स्पष्ट होत आहे. वैवाहिक वस्त्रांत दोघांचेही एकत्रित असलेले माॅर्फ फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून नेटिजन्सकडून दोघांवरही शुभेच्छांचा वर्षा होत आहे. हे ते दोघे जाणू शकतात. यापूर्वी एका चाट शोमध्ये विजयने रश्मिकाबद्दल एक सुंदर कोट व्यक्त केले होते. त्यात तो तिला ती सुंदर को आर्टिस्ट असून माझे तिच्यावर खूप प्रेम असून ती माझी सर्वात चांगली मैत्रीण असल्याचे म्हणाला होता. त्यामुळे, रश्मिका विजय बद्दल काही बोलत नसली आणि विजयने रश्मिकाला मैत्रीण म्हणले असले तरी माझे तिच्यावर खूप प्रेम असल्याचे स्पष्ट केल्यामुळे, दोघांमध्येही मैत्रीपेक्षा खूप जवळचे नाते असल्याचे स्पष्ट होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा