पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा समावेश
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
पंढरपूर शहर व तालुका धनगर समाजाच्या वतीने कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील यांच्या उपस्थितीत महेश साठे यांचा सत्कार करण्यात आला.
पंढरपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याचे काम पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात राहून गेले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्याच्या कामाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करावा. यासाठी बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश केल्याबद्दल धनगर समाजाच्या वतीने महेश साठे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माऊली हळणवर, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर,शालिवहन कोळेकर,पंकज देवकते,नानासाहेब खांडेकर, विनोदराज लटके, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अर्जुनराव चव्हाण व असंख्य धनगर समाजातील कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा