शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजेंद्र कोंढरे साहेब व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्रजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा तसेच पंढरपूर ,मंगळवेढा, माळशिरस, करमाळा, सांगोला या तालुक्यातील नूतन कार्यकारणी, पदाधिकारी तसेच विविध कक्षांचे अध्यक्ष यांना नियुक्तीपत्रे प्रदान समारंभ आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी मा. नरेंद्रजी पाटील साहेब यांची पुन:श्च निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार समारंभ रविवार,दिनांक 20 /11/ 2022 रोजी सकाळी 11:०० वा. तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड, पंढरपूर येथे आयोजित केला आहे.
सदर मेळामध्ये नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत .तसेच तरुण युवकांना व्यवसाय संबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे .तसेच मराठा महासंघाच्या अधिवेशनाबाबत विचार विनिमय करण्यात येणार आहे .सदर मेळाव्यास संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी तसेच सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी मराठा समाजातील तरुणांनी, महिलांनी, युवतींनी आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री अर्जुनराव चव्हाण साहेब यांनी केले आहे .
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा