हरणा नदीत 3 बळी : पुलासाठी ग्रामपंचायतीचे साकडे
शिवशाही वृत्तसेवा सोलापूर
हरणा नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या मूर्ती येथील शिवानंद वाले या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल 27 तासानंतर हाती शासकीय रुग्णालयात शेवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी हरणा नदी काठच्या स्मशानभूमी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्षभरात हरणा नदीच्या पुरात वाहून गेलेले शिवानंद वाले तिसरे बळी होते. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेताकडून घराकडे निघालेले शिवानंद वाले हे शेतकरी नदीपात्रात अचानक पाणी वाढल्याने वाहून गेले या घटनेनंतर शोधाशोध करूनही ते सापडले नाहीत. त्यांच्या शोधासाठी नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी नदीकाठावर रात्र घालवली. शनिवारी दिवसभर आणि रात्रभर शोध घेतला, मात्र पुराचे पाणी ओसरल्यानंतर रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दर्शनसाळीच्या हद्दीत नदीपात्रात झाडाला अडकलेला त्यांचा मृतदेह दिसला.
या घटनेनंतर नुसती ग्रामपंचायत सरपंच नागराज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, आणखीन किती बळी जायला हवेत मग मुलाला मंजुरी मिळेल. असा सवाल विचारणारे पत्र पाठवले. चार महिन्यापूर्वी अशीच दुर्घटना घडली होती. त्यावेळी मृतदेह रुग्णालयात ठेवून ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. प्रशासनाने त्याची दखल घेतली असल्याचे सांगण्यात याचे स्मरण सरपंच नागराज पाटील यांनी प्रशासनाला करून दिले आहे. मृताच्या वारसांना दहा लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
प्रशासनावर ताशेरे
नुसती ग्रामस्थाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हरणा नदीवरील पूल बांधण्यास मान्यता मिळाली पाहिजे. ही मागणी जुनी असून प्रशासन याबाबत पावले उचलत नाही. आता आणखीन किती जणांचा बळी गेला पाहिजे त्यानंतर आम्ही मागणी करू हे तरी स्पष्ट व्हायला हवे. बेघर बेघर वस्ती येथील दीड हजार लोकसंख्या आणि नुसती गावाचा या पुराने संपर्क तुटतो. ग्रामस्थांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. आतापर्यंत शेकडो जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. माणसे वाहून जात आहेत. कुणाच्या मंजुरीसाठी आम्ही ग्रामस्थ एकत्रितपणे पाठपुरावा करू, अशी प्रतिक्रिया सुनील कळके, महादेव पाटील, अशोक कस्तुरे, पंकज पाटील, दीपक नारायणकर यांनी दिली.
अधिकारी घटनेपासून गावात तळ ठोकून आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती आल्यानंतर अहवाल आणि मृताच्या वारसांना मदत देण्याचा प्रस्ताव पाठवला पाहिजे. नदीवरील पुलाचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याकडे प्रलंबित आहे. त्यावर योग्य निर्णय होईलच.अमोल कुंभार तहसीलदार
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा