वांगीच्या कारभारात स्त्रीशक्ती आणि तरुणाईचा मिलाफ
शिवशाही वृत्तसेवा, जेऊर
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणणुकीत करमाळा तालुक्यातील वांगी २ च्या ग्राम पंचायतीवर नारायण पाटील गटाची सत्ता आली असून पूजा सतीश चौधरी यांची सरपंच पदी निवड झाली आहे. २१ वर्षीय पूजा सतीश चौधरी या जिल्ह्यातील सर्वात कमी वयाच्या महिला सरपंच ठरल्या आहेत. वांगी दोनच्या सरपंच पदी पूजा चौधरी यांची निवड करण्यात आली. वयाच्या 21 व्या वर्षी सरपंच झालेल्या त्या करमाळा तालुक्यातील एकमेव आहेत.
वांगी दोन ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. सरपंचपदी पाटील गटाच्या पूजा चौधरी यांची तर उपसरपंचपदी बशीर खुदबुद्दीन पटेल यांची बिनविरोध पदी निवड झाली. करमाळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वांगीचे विभाजन होऊन नूतन ग्रामपंचायत निवडणूक होऊन निकाल लागला. यात माजी आमदार नारायण पाटील गटाचे पाच सदस्य निवडून आले. यावेळी मंगल जाधव, सुनील डावरे, सुरेश जाधव, बशीर पटेल आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा