पत्नी दवाखान्यात ऍडमिट, जमीन गेलेली, हक्काचे पैसे मिळत नाहीत, मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांचे लक्ष नाही मग मी काय करू ?अन्यायग्रस्त शेतकरी विजय लोंढे
शिवशाही वृत्तसेवा,मोहोळ.
पाटकुल येथील शेतकरी विजय लोंढे यांनी पाणी व संपादित जमिनीचा मोबदला दिला नाही या नैराश्याने दोरी नरड्याला लावून आवळून फास घेण्याचा प्रयत्न करत आसताना वेळीच प्रभाकर देशमुख यांनी दोरी त्यांच्या गळ्यातील काढून त्यांची समजूत घालून जीव वाचवला मोहोळ तालुक्यातील मौजे पाटकुल येथे गेल्या सात दिवसापासून आष्टी उपसा सिंचन योजनेच्या खोल कॅनॉलमध्ये चाळीस फूट खड्ड्यात पडत्या पावसामध्ये महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना आंदोलन सुरू आहे ते आंदोलनात अचानकच कॅनॉल मध्ये येऊन पाटकुल येथील शेतकरी विजय लोंढे यांनी दोरी गळ्यात घालून आवळुन फास घेण्याचा प्रयत्न केला असता वेळीच प्रभाकर देशमुख यांनी पळत पळत जाऊन दोरी गळ्यातून काढून त्यांची समजूत काढून त्यांचा जीव वाचवला व तातडीने देशमुख यांनी मोहोळ पोलीस स्टेशनला कळवले तातडीने बीडचे हेड कॉन्स्टेबल समाधान पाटील हे आंदोलन स्थळी आले
शेतकरी विजय लोंढे यांची पत्नी दवाखान्यात ऍडमिट होते त्याला खर्च झाल्यामुळे माझ्याकडे पैसे नाहीत आता माझी जमीन गेलेली हक्काचे पैसे मिळत नाहीत मंत्री आमदार अधिकाऱ्यांचे लक्ष नाही मग मी काय करू या संतापानेच त्यांनी हा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता ही वस्तुस्थिती देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली गेल्या सात दिवसापासून महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आष्टी उपसा सिंचन योजनेच्या रखडलेल्या कामाला सुरुवात करावी व त्वरित पाणी व संपादितत जमिनीचा व फळबागेचा मोबदला द्यावा या व इतर मागण्या साठी आंदोलन चालू असताना पाटकुल गावचे बाधित शेतकरी लाभार्थी विजय लोंढे हे दररोज आंदोलन स्थळी येत असत परंतु अचानकच तीन वाजता त्यांनी प्रभाकर भैय्या देशमुख व इतर शेतकऱ्यांची चर्चा करत करत अचानकच माझी मंडळी आजारी आहे मला दवाखान्यासाठी पैसे नाहीत व्याजानं पैसे मागितली तर मिळत नाहीत असं बोलत बोलत जो दोर खाली कॅनॉलमध्ये उतरण्यासाठी बांधलेला आहे तोच दोर स्वतःच्या गळ्यात घालून फास घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्वरित प्रभाकर देशमुख यांनी तातडीने वरती जाऊन त्यांच्या गळ्यातला दूर काढून घेऊन त्यांना समजावून सांगून त्यांचा जीव वाचवला.
सव्वीस वर्षे झाले ही योजना रखडत पडली नाही शासनाची उदासीनता आमदार मंत्री महोदयांचं बेजबाबदारपणा अधिकाऱ्यांचा भेजा बदल पणा त्यामुळे या भागातील पाटकुल गावचे शंभर ते दीडशे शेतकरी संपादित जमिनीचा मोबदला फळबागेची नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत त्यामुळे अनेक जणांची मनस्थिती बिघडलेल्या अवस्थेत असल्याचे बोलताना पत्रकारांशी प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.
वरील मागण्या व पुढील मागण्या सिना माढा सिंचन योजनेमध्ये वाफळे देवडी तेलंगवाडी अनगर अनगरवाड्याचा व अष्टी उपसा सिंचन योजनेत हिवरे वडाचीवाडी चिखली यावली आढेगाव चा समावेश करण्यात यावा तसेच सारोळे खवणे पोखरापूर कामाला तरी सुरुवात करून संपूर्ण कार्यक्षेत्र उलित खाली घ्यावे या मागणीसाठी आम्ही आमच्या मागण्याची ठाम असल्याचेही देशमुख यांनी बोलताना सांगितले जीव गेला तर बेहत्तर पण हा लढा आमचा सुरूच ठेवणार यावेळी जनहितचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील हरिभाऊ मुळे मारुती भांगे तानाजी मुळे देविदास माने कुमार गोडसे मोहन बापू काळे अरविंद काळे नवनाथ सातपुते कालिदास काळे मधु ननवरे बाळू आवळे लाला वाघमोडे सुरेश कांबळे अरुण कांबळेनाना मोरे नितीन जरक बापूराव काळे भीमा राऊत इत्यादी उपस्थित आहेत
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा