परतीच्या पावसाचा कहर करमाळा तालुक्यातील सोळा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र बाधित
शिवशाही वृत्तसेवा, करमाळा
तालुक्यात अतिवृष्टीमुळे 16000 पाचशे हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. तालुक्यात सर्व मंडळांमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पंचनामे करण्यासाठी शेतामध्ये पाणी असल्याने व सतत पाऊस पडत असल्याने अडथळे येत आहेत.
करमाळा तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे या पावसामुळे होत असलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार समीर माने यांनी संबंधितांना दिल्या आहेत. दरम्यान, करमाळा तालुक्यात साधारण सोळा हजार पाचशे हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्या असल्याचा अंदाज तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी व्यक्त केला आहे.
पंचनामे करण्यासाठी सर्व संबंधित कर्मचारी शेतात जात आहेत, मात्र पावसामुळे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत तरीही सर्व पंचनामे केले जातील, असे सांगण्यात आले. करमाळा तालुक्यात बुधवार पर्यंत एकूण सरासरी 896 मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस 176 टक्के झाला करमाळा तालुक्यात सरासरी ५०९.५० मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. मात्र जास्त पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी, अशी मागणी होत आहे
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा