पोलिसांनी घरावर चढून विळ्याने फोडल्या टाक्या
![]() |
संग्रहित चित्र |
शिवशाही न्यूज वृत्तसेवा सोलापूर
घराचा छतावर पाण्याच्या काळा टाकीत केलेला गावठी दारूचा साठा पोलिसांनी नष्ट केला. पत्र्याच्या घरावर झाडावरून टाकीपर्यंत पोहोचलेल्या पोलिसांनी वेळ्याच्या सहाय्याने दारूने भरलेली टाकी फोडली. ही कारवाई सोलापूर तालुका पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव भानुदास तांड्यावर केली.
या कारवाई दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त करून चार लाख 68 हजार रुपये किमतीचे 21 हजार दोनशे लिटर गूळ मिश्रित रसायन, 106 प्लास्टिक बॅरेल व 320 लिटर हातभट्टी दारू रस्त्यावर सांडून दिली. एवढेच नव्हे तर दारुणे भरलेले रबरी ट्यूब विळ्याने फोडून दारू रस्त्यावर ओतून दिली. याप्रकरणी आठ जणांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
106 प्लास्टिक डायरेक्ट फोडले
या कारवाई पोलिसांनी 196 प्लास्टिक बॅरल मधील हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित रसायन नष्ट केले. घरात झाडाझुडपात ठेवलेले बॅरेल पोलिसांनी बाहेर काढून रसायन रस्त्यावर सांडून दिले.
दारूमुळे परिसरात दुर्गंधी
दारूच्या वासामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. शिवाय घरावर ठेवलेल्या टाकीतील दारू रस्त्यावर नष्ट केल्याने तांड्यावर मोठ्या प्रमाणात दारूचा घमघमाट सुटला होता. त्यामुळे पोलिसांनीही नाकाला रुमाल लावूनच मोहीम फत्ते केली.
टी-शर्ट आणि जीन्स पॅन्ट वर पोलिसांची मोहीम
पोलीस असल्याचे लक्षात येऊ नये म्हणून पोलिसांनी वेशांतर केले होते. टी-शर्ट जीन्स पॅन्ट घालून सुरुवातीला अवैध्य दारूचे आड्डे शोधले. त्यानंतर अधिकचा पोलीस बंदोबस्त मागून त्या वैद्य धंद्यावर कारवाई केली.
या टीमने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुहास जगताप, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, राखीव पोलीस उपनिरीक्षक काटे, शैलेश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, यांच्यासह पोलीस कर्मचारी बागवान घोळवे, महेंद्रकर, देवकर, स्वामी, सय्यद, माळी, चमके, मोरे, आसिफ शेख, मुजगोंड मुल्ला, किशोर सलगर, नदाफ, साबळे, चिन्हगुंड, खोत व पोलीस मुख्यालयाकडील कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांनी बजावली.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा