सरपण आणायला गेलेल्या आई आणि लेकरांचा दुर्दैवी अंत
सरपण आणण्यासाठी तीस वर्षीय महिला दोन बालकांसह जिंतूर तालुक्यातील निवळी येथील करपरा धरण परिसरात मंगळवारी सकाळी दहा वाजता गेली होती. तहान लागल्यामुळे ते तलावात उतरले असता, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. नसरीन रसूल पठाण ( ३०), आयान रसूल पठाण ( ३ वर्ष ), सना रसूल पठाण ( दीड वर्ष), अशी मयताची नावे आहेत.
त्यानंतर पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरू झाले. मंगळवारी सायंकाळी 5:30 च्या सुमारास दोन चिमुकले या पाण्यात तरंगताना आढळून आले. मात्र महिला बेपत्ता असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शोध कार्य चालू होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा शोध कार्य सुरू केले असता, बुधवारी सकाळी 11:00 च्या सुमारास जलाशयात नसरीन रसूल पठाण या देखील मृत अवस्थेत आढळून आल्या.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा