नवी मुंबईत उभारणार बंजारा भवन
शिवशाही वृत्तसेवा ठाणे
असंघटित कामगारांसाठी लवकरच चांगला निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात दिली. तर , पोहरादेवी तीर्थसाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. बंजारा भावना बाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघातर्फे शिंदे आणि फडणवीस यांचा भव्य सत्कार तसेच आत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण ठाण्यातील ठोकळी येथील हायलँड मैदानात रविवारी झाले. त्याप्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते.
शिंदे यांनी भाषणाची सुरुवात बंजारा भाषेतून केली. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. ते म्हणाले, या समाजाचे महाराष्ट्राच्या उभारणीत, विकासात मोठे योगदान आहे. पांडा वस्तीत मूलभूत सुविधा पुरवण्याला प्राधान्य दिले जाईल.
सेवालाल जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचे तसेच बंजारा भावना साठी जागा देण्याची मागणी सुरुवातीला बंजारा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शंकर पवार यांनी केली. या दोन्ही मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करत सेवालाल जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी स्तरावर सुट्टी देण्याचे जाहीर केले.
पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही: फडणवीसबंजारा भाषेतून संवाद साधत फडणवीस म्हणाले की, बंजारा समाजा सिंधू संस्कृतीशी नाते सांगणारा आहे. टॅटू चा जनक हा समाज आहे. या समाजाकडे मोठे ज्ञानाचे भांडार आहे. अशा या बंधारा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील, पोहरादेवी विकासासाठी शंभर कोटी दिले. त्याचे काम आता वेगाने पूर्ण होईल. जागतिक दर्जाचे हे स्थान होईल. पोराहा देवीचा विकासासाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा