महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी स्वीकारला पुरस्कार
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर
‘स्वच्छ सर्वेक्षण -2022’ अंतर्गत देशातील झालेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यावेळी देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते तलकोटरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणींमध्ये राज्याला आज एकूण 23 पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने येथील तालकटोरा स्टेडियमध्ये ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-2022’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते विविध श्रेणीतील सर्वोत्तम 12 पुरस्कारांचे यावेळी वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीपसिंह पुरी, राज्यमंत्री कौशल किशोर आणि सचिव मनोज जोशी यावेळी उपस्थित होते.
पंढरपूर नगरपरिषदेला केंद्रीय गृहनिर्माण व शहरी राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या शुभहस्ते पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री अरविंद माळी यांना पुरस्कार देण्यात आला यावेळी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री शरद वाघमारे, श्री नागनाथ तोडकर,संतोष ऐतवाडकर, अभिजीत घाडगे आणि शहाजी चव्हाण हे उपस्थित होते.
पंढरपूर नगरपालिकेला मिळालेला सन्मान हा पंढरपूर शहरातील प्रत्येक नागरिकाने यांनी या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छतेमध्ये दिलेल्या योगदानामुळे व नगरपालिकेच्या सांघिक प्रयत्नामुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी यावेळी दिली
#SwachhSurvekshan-2022 #PresidentDraupadiMurmu #NewDelhi #Bestperformingstate #ThirdPrize #CityCouncil #Pandharpur #UnionHousingandUrbanDevelopmentMinister #HardeepSinghPuri #MinisterofStateKaushalKishore #ShivshahiNews
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा