तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठीची सवलत कायम
शिवशाही वृत्तसेवा पुणे
जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तीन ते पाच लाखापर्यंत कर्जासाठी देण्यात येत असलेली शून्य टक्के व्याजदराची सवलत बंद करण्यात येत असल्याची घोषणा बँकेचे संचालक व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. बँकेच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठीची सवलत कायम राहील, अशी वाई त्यांनी यावेळी दिली.
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी सन्मान योजनेसाठी नाबार्ड कडून बँकेला मिळणारा अर्धा टक्का व्याज परतवा कमी झाला असून हा भार राज्याने उचलावा किंवा केंद्राने तो पूर्ववत करावा या मागणीचा पाठपुरावा येत्या अधिवेशनात करू असेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा सरकारी बँकेच्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी माझी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अशोक पवार, संजय जगताप, दिलीप मोहिते,बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे उपस्थित होते.
पवार म्हणाले,' जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी पाच लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के व्याजदराची सवलत सुरू होती. मात्र , यात बदल करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. तीन लाखापर्यंतच्या कर्जासाठी ही सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या मर्यादेत सुमारे दोन लाख 43 हजार 339 शेतकरी सुमारे 2165 कोटीचे कर्ज घेतात. या शेतकऱ्यांसाठी बँकेला सात ते आठ कोटींचा भार सहन करावा लागतो.
येत्या अधिवेशनात मुद्दा मांडणार
केंद्र सरकारने ना बाईच्या माध्यमातून व्याज परतावा दोन टक्क्यांवरून दीड टक्का केला आहे. त्यामुळे राज्याची डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी सन्मान योजना अडचणीत आली आहे. हा अर्धा टक्क्याचा भार जिल्हा बँकेला पेलणे शक्य नाही. एक तर हा भार राज्याने पेलावा किंवा केंद्राने पुन्हा दोन टक्के करावा अशी मागणी येत्या अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. रिझर्व बँकेचे धोरण आता नेहमीच बदलत त्यामुळे जिल्हा बँकेला यापुढे गृहकर्जाकडे वळावे लागेल असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा