रंगीली उर्मिलाच्या प्रेमात श्रेयस!
' या ही रे .....' म्हणत असंख्य तिने प्रेमींना वेड लावणाऱ्या उर्मिला मातोंडकर सोबत कधी काम करण्याची संधी मिळेल, असे स्वप्नातही पाहिलं नसल्याची भावना अभिनेता श्रेयस तळपदेणे व्यक्त केली. परितोष पेंटर यांनी लिहिलेल्या ' ती मी नव्हेच ' या आगामी मराठी चित्रपटात श्रेयस तळपदे आणि उर्मिला मातोंडकर एकत्र दिसणार आहेत. यांच्या जोडीला निनाद कामतही आहेत.
या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलताना जुन्या आठवणींमध्ये रमलेला श्रेयस म्हणाला की त्याकाळी ' रंगीला ' मधील ' या ही रे .....' या गाण्यातील उर्मिलाच्या रूपाने सर्वांना घायाळ केलं होतं. त्यात उर्मिला सोबत कधी काळी स्क्रीन शेअर करायला मिळेल असं वाटलं नव्हतं परितोषनं ही किमया साधली आहे. योगायोग म्हणजे आम्ही दोघेही मिठीबाई कॉलेजचे विद्यार्थी आहोत उर्मिला सोबत काम करण्याची संधी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे .आता हे दोघे पडद्यावर एकत्र कसे दिसतात हाच प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. खरंतर उर्मिला तिच्या लग्नानंतर बॉलीवूड पासून लांब गेली होती. आता मात्र असे दिसते की पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा राजकारणातील प्रवासही प्रेक्षकांनी पाहिला.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा