maharashtra day, workers day, shivshahi news,

आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश - मुंबईत उच्चस्तरीय बैठक - MIDC च्या जागा पाहणी साठी सोमवारी पथक येणार

पंढरपुरातील युवकांना मिळणार रोजगाराच्या संधी

midc, pandharpur, mla samadhan autade, uday samant, shivshahi news

शिवशाही वृत्तसेवा मुंबई 

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा येथील तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी मागील अनेक दिवसापासून भक्कम पाठपुरावा सुरू केला आहे, यासाठी पंढरपूर तालुक्यासाठी MIDC ची स्थापना लवकरच होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवले होते, या कामे गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्या दालना मध्ये अधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यातील नेते मंडळी यांच्या समवेत बैठक झाली यामध्ये सविस्तरपणे चर्चाही झाली . 

या झालेल्या बैठकी मद्ये पंढरपूर तालुक्यातील MIDC च्या प्रमुख विषयास सह मंगळवेढा तालुक्यातील MIDC बाबत ही चर्चा करण्यात आली. पंढरपूर तालुक्यातील MiDC साठी लागणाऱ्या जागे साठी आमदार समाधान आवताडे यांनी कासेगाव अनवली आणि रांझणी या परिसरातील जागे बाबत ची माहिती या बैठकीत देण्यात आली.

  या बाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या बैठकित तत्काळ सूचना दिल्या आहेत, या मद्ये येत्या सोमवारी दिनांक १९ सप्टेंबर रोजी वरील सुचविण्यात आलेल्या जागेची पाहणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे या झालेल्या बैठकी मधून जी चर्चा झाली आणि पुढील कार्य वाहिसाठी तत्काळ सुरवातही झाली आहे, यावरून आमदार समाधान आवताडे यांच्या अथक पाठ पुराव्याला नक्की यश मिळणार असे दिसून येत आहे.

आमदार समाधान आवताडे हे स्वतः उद्योगपती आहेत सुरवाती पासूनच तरुणाच्या हाताला काम देणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असल्याचे दिसून आले आहे.यामुळे पंढरपूर तालुक्यात MIDC होण्यासाठी त्यांनी मागील अनेक महिन्यांपासून पाठ पुरावा केला आहे. पंढरपूर तालुक्यातील ज्वलंत प्रश्न मागील अनेक वर्षापासून कागदावरच दिसून येत होता.परंतु हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी जीवाचे रान केले आहे.त्यामुळे या प्रकलापाचा लवकरच मुहूर्त लागणार असल्याचे चित्र पहावयास मिळू लागले आहे,

 पंढरपूर तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता या ठिकाणी असलेले रस्ते ,पाणी, वीज,जमीन आणि रेल्वे स्टेशन या बरोबरच पंढरपूर साठी येणाऱ्या लाखो लोकांची वर्दळ पाहता ही MIDC या पूर्वीच होणे अपेक्षित होते.परंतु या विषयावर केवळ निवडणुकी पुरते चर्चा होत होती, त्यांनतर मात्र यासाठी प्रयत्न झाले नसल्याने MIDC होऊ शकली नव्हती परंतु या सेना भाजपा सरकारच्या कार्यकाळात पंढरपूर ची MIDC ही नक्की करून दाखवणार असा शब्द आमदार समाधान आवताडे यांनी दिला आहे,त्या दृष्टीने हालचालींना ही वेग आला असून ही MIDC लवकरच होणार हे मात्र नक्की झाले आहे.

मंगळवेढा एमआयडीसी मध्ये अनेक उद्योग असणे गरजेचे आहे,परंतु या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जागा गुंतवून पडली आहे,त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जागा देऊन ही केवळ 10 लोकांच्या हाताला काम मिळत असल्याचे चित्र पहावयांसं मिळत आहे तरी तो सौर ऊर्जा प्रकल्प मंगळवेढा येथील औद्योगिक वसाहती मधून बाजूला सारण्यात यावा आणि त्या ठिकाणी अनेक उद्योजकांना जागा मिळवून देऊन अनेक तरुणांच्या हाताला काम मिळावे अशी मागणीही या बैठकीमध्ये केली होती.त्यानुसार या गंभीर विषयावर ही चर्चा झाली त्यामुळे मंगळवेढा येथील MIDC मद्ये ही सुरू असलेल्या प्रकारची पाहणी करण्यासाठी पथक जाणार असल्याचे ही मंत्रालयात झालेल्या बैठकी मद्ये ठरले आहे.

या बैठकी मद्ये आमदार मा.श्री.सुभाष बापू देशमुख, भाजपा जिल्हा अध्यक्ष व आमदार मा.श्री.सचिन कल्यानशेट्टी,मनसे नेते दिलीप धोत्रे, पंढरपूर चे तहसिलदार सुशील बेल्हेकर सो आदी मान्यवर उपस्थित होते.

-------------------------------------------------------------------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !