रातोरात सोशल मीडियाने जयेश खरे ला बनवलं स्टार
शिवशाही वृत्तसेवा, राहुरी
रंकाचा राव करणाऱ्या सोशल मीडियाची जादू आजवर बऱ्याच जणांनी अनुभवली आहे. तळागाळातील टॅलेंट जगासमोर आणणाऱ्या सोशल मीडियाने शिर्डी जवळील राहुरी पासून 30 किमी वर असलेल्या एका गावात राहणाऱ्या गरीब घरातील जयश खरे नावाच्या मुलालाही वन नाईट स्टार बनवला आहे. सहावी इयत्ता शिकणाऱ्या जयश्री शाळेच्या गणवेशात गायलेलं ' चंद्रमुखी ' चित्रपटातील ' चंद्रा....' हे गाणं युट्युब वरून धुमाकूळ घालत आहे. हे गाणं संगीतकार अजय अतुल पर्यंत पोहोचल्यावर त्यांनी जयेश चा शोध घेतला. त्याला मुंबईला आणून हॉटेलमध्ये ठेवलं. त्याच्यासोबत दोन दिवस तालीम केली आणि त्याच्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड केलं. हे गाणं केदार शिंदे दिग्दर्शित ' महाराष्ट्र शाहीर ' चित्रपटात ऐकायला मिळेल.
अजय अतुल यांनी जयेश कडून शाहिराच्या लहानपणीचा गाणं गाऊन घेतला आहे. जयेश हा सर्वसामान्य घरातील असून, त्याचे वडील ऑर्केस्ट्रा मध्ये की - बोर्ड वाजवतात. वर्षातील केवळ सहा महिनेच त्यांना ऑर्केस्ट्रा मध्ये काम मिळतं. इतर दिवशी ते शेतमजुरी करून घर आणि जयेशच्या शिक्षणाचा खर्च जयेश चार वर्षाचा असतानाच वडिलांनी त्याचा गाण्याकडे असलेला कल ओळखून त्याला प्रोत्साहन दिलं. सोशल मीडियामुळे घरोघरी पोहोचलेला जयेश चा आवाज चित्रपट गीता द्वारे रसिकापर्यंत पोहोचणार आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा