साऊथ चे चित्रपट चालतात हिंदी मात्र चालेनात
आज-काल बॉय कट चा ट्रेंड आणि अनेक संकटाचा बॉलीवूड सामना करत आहे. अनेक बड्या कलाकारांचे चित्रपट धडा धडा आपटत आहेत. केवळ एका हिट साठी मोठमोठे कलाकार सध्या धडपड करताना दिसतात. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांना नको नको त्या गोष्टी कराव्या लागत आहेत. तरीही अनेक चित्रपटाचा बॉक्स ऑफिस गल्ला हवा तसा भरत नाही. एकीकडे दक्षिणात्य चित्रपट कमाईचे नवनवे रेकॉर्ड करत आहे. तर बॉलीवूड मात्र पैशा पैशासाठी मेहनत करत आहे. सॅटॅलाइट आणि ओटीटी राइट्स वरच हिंदी चित्रपटाचे भविष्य अवलंबून आहे का ? अशी स्थिती दिसत आहे. आता शाहरुख खानचा जवान आणि अक्षय कुमारचा रामसेतू हे चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहेत. मात्र या चित्रपटाच्या यशाबाबत दोन्ही कलाकार शासन आहेत.
रिलीजपूर्वीच ' जवान ' ने केली 250 कोटी ची कमाई
अभिनेता शाहरुख खान जबरदस्त कम बॅक साठी सज्ज झाला आहे. यातच आता शाहरुख त्याचा आगामी 'जवान ' चित्रपटामुळे खूप चर्चेत आला आहे. साउथ सेनेसृष्टीत मोठे हिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक ॲटलीसोबत शाहरुखच्या कामाची लोकांमध्ये अशी क्रेझ आहे की, 'जवान ' राइट्स साठी जोरदार स्पर्धा लागली होती. रिपोर्टस नुसार, नेटफ्लिक्स ने हक्क विकत मिळवण्यासाठी 120 कोटीचा करार केला आहे. 180 कोटी बजेट असलेल्या ' जवान ' आतापर्यंत 250 कोटीची कमाई केली आहे.
अक्षय वाचवणार ' रामसेतू ' ?
सध्या एका हिट चित्रपटाची नितांत गरज असलेल्या अक्षय कुमारच्या ' रामसेतू ' या आगामी हिंदी चित्रपटाचा नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. ' रामसेतू को बचाने के लिए हमारे पास सिर्फ तीन दिन है 'असं म्हणत या चित्रपटातील आपल्या मोहिमेबाबत टिझर मध्ये अक्षय त्यानंतर थेट ' ॲप्रोचिंग रामसेतू ' असं म्हणत या चित्रपटाचा सिजर संपतो. या दोन संवादाच्या मध्ये घडलेल्या ज्या घटना थोडक्यात आणि अत्यंत वेगात दाखवण्यात आले आहेत, त्यात उत्सुकता वाढवण्याचं काम करतात. या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची उत्सुकता रामभक्तांना जितके आहे तितकी सर्वसामान्य प्रेक्षकांनाही आहे. या टीझर सोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ही घोषित करण्यात आली आहे. एका मिनिटाचा हाती जर रामसेतूच्या फॅट्सची वर्ल्ड ची सफर घडवतो. अक्षय सोबत जॅकलीन फर्नांडिस या चित्रपटात दिसणार आहे.
---------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा