तापाने फणफणलेल्या अवस्थेत सूर्यकुमार यादवची तडाखेबंद खेळी
शिवशाही वृत्तसेवा हैदराबाद
विजयासाठी काही पण करण्याची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने रविवारी हे सिद्ध केले. तापाने फडफडत असतानाही तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक टी - २० सामन्यात उतरला आणि सामनावीर ठरला. 32 वर्षाच्या सूर्यकुमार यादवने 191.66 च्या स्ट्राइक रेटने 36 चेंडूत 69 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याचा खेळीमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे 187 धावाचे लक्ष चार गडी गमावून पूर्ण केले. विजयानंतर सूर्य कुमारने अक्षर पटेल यांच्याशी चर्चा करताना आपल्या आजाराविषयी खुलासा केला.
हा व्हिडिओ बीबीसीआयने सोमवारी सोशल मीडियावर पोस्ट केला. सूर्य कुमारने सांगितले की, या सामान्यपूर्वी त्याची तब्येत खराब होती आणि त्याला नीट झोपही येत नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यापूर्वी मध्यरात्री तीन वाजता सूर्यकुमार आजारी पडला होता. त्याला पोट दुखी आणि ताप आला होता. त्याची करोना चाचणी सुद्धा करण्यात आली; पण सुदैवाने त्यात काही आढळले नाही.
From setting the stage on fire to a special pre-match tale! 🔥 😎
— BCCI (@BCCI) September 26, 2022
Men of the hour - @surya_14kumar & @akshar2026 - discuss it all after #TeamIndia's T20I series win against Australia in Hyderabad. 👍 👍- By @RajalArora
Full interview 🔽 #INDvAUS https://t.co/rfPgcGyO0H pic.twitter.com/rDWz9Zwh3h
'थोडं पोट दुखत होतं त्यानंतर तापही आला होता, पण मला हे देखील माहीत होते की हा सामना निर्णायक आहे, म्हणून मी माझ्या डॉक्टर आणि फिजिओला सांगितलं की , मी स्वस्थ बसणार नाही. हा विश्वचषकाचा अंतिम सामना असेल तर मी काय करणार? अशावेळी देश महत्त्वाचा असतो. म्हणून तुम्ही काहीही करा अगदी काहीही करा, कोणतीही गोळी द्या, अथवा इंजेक्शन द्या, पण मला संध्याकाळच्या खेळासाठी तयार करा. एकदा तुम्ही मैदानावर आलात, जर्सी घातली, मग तुमच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते .' असे मत सूर्याने व्यक्त केले.
सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्यात 62 चेंडूत 104 धावांची भागीदारी झाली. शेवटच्या षटकार 11 धावांची गरज होती. कोहलीने पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि पुढच्या चेंडूवर तो बाद झाला. यानंतर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याने भारताला विजय मिळवून दिला.
-------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा