मंगळवेढा तहसील कार्यालयात स्वच्छतेचा बोजवारा
शिवशाही वृत्तसेवा मंगळवेढा ( राज सारवडे )
मंगळवेढा तालुक्यातील हजारो शेतकरी दैनंदिन कामकाजासाठी तहसील कार्यालय व खरेदी विक्री व्यवहाराचे निबंध कार्यालय या ठिकाणी येत असतात परंतु नैसर्गिक विधी उरकण्यासाठी संडास बाथरूम व मुतारी यांची दुरावस्था इतकी झाली आहे. की ते सध्या वापरात नाही. मंगळवेढा तालुक्यामध्ये शासकीय यंत्रणेने संपूर्ण तालुका हागणदारी मुक्त करण्याचा विडा उचलला.. त्या पद्धतीने कागदोपत्री तो पूर्ण झाला. परंतु शासकीय जागेवरील संडास बाथरूमची दुरावस्था इतकी वाईट झाली आहे. कि त्यामुळे महिला व नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. एका संडास बाथरुम मध्ये तर रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या त्यामुळे नेमकं तहसील कार्यालय आहे की दारूचा अड्डा आहे असा ही प्रश्न पडतो. यासाठी तहसील कार्यालयातील संडास बाथरूम व मुतारीची दुरावस्था पाहून प्रहार संघटनेने वारंवार तोंडी पाठपुरावा करूनही आज करतो उद्या करतो पंधरा दिवसात करतो. अशा स्वरूपाची कारणे देऊन टोलवा टोलवी सुरू असल्याने प्रहार संघटनेने येत्या आठ दिवसात तहसील कार्यालयाच्या आवारातील सर्व संडास बाथरूमची दुरुस्ती करून ते वापरात न आणल्यास तहसीलदारांना संडासचे भांडे देऊन अनोखे प्रहार स्टाईलने आंदोलन करू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेने नायब तहसिलदार साळुंखे साहेब यांना निवेदनाद्वारे दिला.
यावेळी प्रहार संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा संतोष पवार,पुरवठा शाखेचे भोसले साहेब, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र सावंत, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी प्रहार संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख तानाजी माने प्रहारचे धडाडीचे नेते बापूसाहेब घोडके युवक आघाडीचे तालुका उपाध्यक्ष राकेश पाटील, नवनाथ शिरसाटकर, शशिकांत कोळी ,फैयाज मुलाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा